Pune Panchayat Samiti Reservation 2025: पुण्यातील 13 पंचायत समित्यांच्या सभापतिपदाचे आरक्षण जाहीर

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रक्रियेनंतर, अनुसूचित जाती, महिला व सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण ठरवले
Pune Panchayat Samiti Reservation 2025
पुण्यातील 13 पंचायत समित्यांच्या सभापतिपदाचे आरक्षण जाहीरPudhari
Published on
Updated on

पुणे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील 13 पंचायत समित्यांच्या सभापतिपदाची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, 5 वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करून जाहीर करण्यात आले.(Latest Pune News)

Pune Panchayat Samiti Reservation 2025
Pune Railway Accident Deaths: पुणे रेल्वे विभागात नऊ महिन्यांत 301 मृत्यू

या वेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहुल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा लोणीकंदचे शिक्षक व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

पंचायत समितीनिहाय जाहीर केलेल्या आरक्षणाबाबतचा तपशील इंदापूर पंचायत समिती-अनुसूचित जाती, जुन्नर- अनुसूचित जमाती महिला, दौंड आणि पुरंदर-नागरिकांचा मागासवर्ग, शिरूर आणि मावळ-नागरिकांचा मागासवर्ग महिला, वेल्हे, मुळशी, भोर आणि खेड-सर्वसाधारण महिला, हवेली, बारामती आणि आंबेगाव-सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

Pune Panchayat Samiti Reservation 2025
Purandar Airport Land Acquisition Compensation: शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला 20 नोव्हेंबरपासून

या वेळी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण सभापतिपदाकरिता सोडत अडीच वर्षे कालावधीकरिता असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news