Operation Flush Out: ऑपरेशन फ्लश आऊटला वेग; पुण्यात 12 दिवसांत 166 गुन्हे दाखल

अवैध दारू, शस्त्रे आणि अमली पदार्थांवर पोलिसांची मोठी कारवाई; मोठा मुद्देमाल जप्त
Operation Flush Out
Operation Flush OutPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे, अमली पदार्थ आणि दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार ‌‘ऑपरेशन फ्लश आऊट‌’ला वेग आला आहे. 20 ते 31 मार्च या 12 दिवसांच्या कालावधीत एकूण 166 गुन्हे दाखल करण्यात आले.

Operation Flush Out
Pune Police Corruption: अवैध धंद्यांशी संबंध; पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याला मोठी शिक्षा

या मोहिमेदरम्यान बेकायदा बाळगणाऱ्यांविरुद्ध आर्म्स ॲक्टअंतर्गत 29 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच अमली पदार्थांच्या विक्री व साठ्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये 13 गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवायांमुळे गुन्हेगारी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले. अवैध दारू विक्रीविरोधातही पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत 31 मार्चपर्यंत 166 गुन्हे दाखल केले. या प्रकरणांमध्ये 134 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, सुमारे 5 लाख 81 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Operation Flush Out
Mula Mutha Pollution: मुळा-मुठा नदी प्रदूषणाचा फटका; हवेलीतील शेती नापीक होण्याच्या मार्गावर

जप्त मालामध्ये 2 हजार 199.9 लिटर गावठी दारू, 108.58 लिटर विदेशी दारू, 40 लिटर ताडी व 20 लिटर रसायनाचा समावेश आहे. याशिवाय 1,337 दारूच्या बाटल्या तसेच 153 गुटखा व तंबाखूची पाकिटेही जप्त करण्यात आली. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर तसेच अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या अवैध हातगाड्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये 195 व्यक्ती व हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

‌‘ऑपरेशन फ्लश आऊट‌’ या मोहिमेत 166 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनीही सतर्क राहून त्यांच्या परिसरात अवैध शस्त्रे, अमली पदार्थ किंवा दारू विक्री होत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.

अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news