पुणे : गज्या मारणे टोळीतील आणखी एकाला अटक

पुणे : गज्या मारणे टोळीतील आणखी एकाला अटक

पुणे : तब्बल 20 कोटींची खंडणी मागून व्यावसायिकाचे अपहरण केल्या प्रकरणात मोक्का कारवाई केलेल्या कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील मयूर राजेंद्र निवंगुणे (वय 24, रा. वसंत प्लाझा, नर्‍हे) या गुंडाला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने नवले ब—ीज परिसरात अटक केली.  मारणे टोळीने एका व्यावसायिकाचे 7 ऑक्टोबर रोजी कात्रज येथून अपहरण केले होते. त्यानंतर गज्या मारणे याने दुसर्‍याच्या फोनवरून धमकी दिल्याने त्याच्यासह पप्पू घोलप, अमर किर्दत, रूपेश मारणे, सांगलीचा हेमंत पाटील, अशा 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, सहायक फौजदार शाहीद शेख, हवालदार नीलेश शिवतरे, पोलिस अंमलदार सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषीकेश कोळप, तेजाराणी डोंगरे या पथकाने सापळा रचून त्याला पकडले.

कारवाईसाठी त्याला सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या ताब्यात देण्यात आले. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news