पुणे : ओतूर येथे नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, एक ठार

पुणे : ओतूर येथे नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, एक ठार
Published on: 
Updated on: 

ओतूर ता. जुन्नर, पुढारी वृत्तसेवा : हद्दीतील नगर-कल्याण महामार्गावरील मांडवी नदीच्या पुलावर बुधवारी (दि.१) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

देवेंद्र उर्फ देवा विकास नलावडे (वय ३१, रा. धोलवड, ता. जुन्नर) असे अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव असून ट्रक (एमएच ०८ डब्ल्यू ८६८७) व दुचाकी (एमएच १२ क्यूव्ही१२८१) या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण धडकेत तरुणाला प्राण गमवावे लागले. यामुळे ओतूर व धोलवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news