Pune Noise Pollution: पुण्यात ध्वनिप्रदूषणाचे १४ हजारांहून अधिक कॉल; पोलिसांकडून ‘हॉटस्पॉट’वर करडी नजर

पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक तक्रारी; गणेशोत्सवापूर्वी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या पाच प्रमुख ठिकाणांचा अभ्यास
Noise Pollution
Noise PollutionPudhari
Published on
Updated on

पुणे: ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना पुणे पोलिसांनी आता ध्वनिप्रदूषणाच्या 'हॉटस्पॉट'वर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. १ जानेवारी ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ध्वनिप्रदूषणाबाबत नागरिकांकडून तब्बल १४ हजार ३९२ कॉल पोलिसांना आले आहेत. यामध्ये पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्याचे समोर आले आहे.

Noise Pollution
Pune Municipal Funds Political Credit: पुणेकरांच्या पैशातून ‘माननीयां’ची चमकोगिरी; महापालिका निधीच्या कामांवर श्रेयाच्या पाट्यांचा सुळसुळाट

शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींचा अभ्यास करून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच प्रमुख ठिकाणे ‘हॉटस्पॉट’ म्हणून निश्चित केली जाणार आहेत. या ठिकाणी आवाज कोणत्या कारणामुळे होतो, तो नेमका कुठून येतो, कोणत्या वेळेत त्याची तीव्रता वाढते, तसेच तक्रारी कोणत्या भागातून आणि कोणत्या ठिकाणच्या आवाजाबाबत येतात, याची माहिती संकलित केली जाणार आहे. विविध मिरवणूक तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडळांकडून डीजे व ध्वनिक्षेपकांचा वापर केला जातो.

Noise Pollution
Pune Nagpanchami Celebration: पुण्यात नागपंचमीचा भक्तिमय जल्लोष; शिवमंदिरांत रुद्राभिषेक, महापूजेसह विविध धार्मिक कार्यक्रम

त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी वाढतात. गणेशोत्सवाच्या काळात या तक्रारींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आधीच ध्वनिप्रदूषणाच्या हॉटस्पॉटचा अभ्यास केला जाणार आहे. केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता सर्व धर्मांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनि प्रदूषणा वरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत आलेल्या प्रत्येक फोनचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच प्रमुख तक्रारींची माहिती घेऊन त्यामागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे.

Noise Pollution
Pune Lemon Prices: श्रावणात लिंबाने केला ‘भाव’ खट्टा; गोणीचे दर थेट १२०० रुपयांवर

तक्रार कोणत्या ठिकाणाहून आली, तक्रारदार कोणत्या परिसरात राहतो, कोणत्या ठिकाणच्या किंवा कोणत्या कार्यक्रमातील आवाजाबाबत तक्रार केली, याची माहिती संकलित केली जाईल. वारंवार तक्रारी येणारी ठिकाणे निश्चित करून तेथे ‘हॉटस्पॉट मॅनेजमेंट’ करण्यावर भर दिला जाणार आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणी आवाजाची पातळी तपासणे, डेसिबलची मर्यादा तपासणे आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास नियमानुसार कारवाई करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे.

Noise Pollution
Pune Fruit Market Rates: पुणे मार्केट यार्डात पपई, सीताफळ महागले; आवक घटल्याने फळांच्या दरात वाढ

पर्वती, कोंढवा, चतुःशृंगी, येरवड्यात तक्रारी अधिक

शहरातील पर्वती, कोंढवा, चतुःशृंगी, येरवडा हडपसर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ध्वनि प्रदूषणाच्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. त्याउलट लोणीकंद, फुरसुंगी आणि लष्कर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तक्रारींचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news