Pune No Parking Zone: पुणेकरांनो लक्ष द्या! सायंकाळी ५ नंतर 'या' रस्त्यांवर ‘नो पार्किंग’; वाहतूक नियमांत तात्पुरते बदल

पुण्यात गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायंकाळी ५ नंतर प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे. काही भागांत एकेरी वाहतुकीचे नियम आवश्यकतेनुसार शिथिल केले जाणार आहेत.
No Parking
No ParkingPudhari
Published on
Updated on

पुणे: गर्दीच्या काळात वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी सायंकाळी ५ नंतर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्‍याची माहिती वाहतूक विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

येथे असेल नो पार्किंग

- शिवाजी रोड : जिजामाता चौक ते मंडई चौक, मंडई परिसर : मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रोड : शनिपार चौक ते फुटका बुरुज, अप्पा बळवंत चौक : अप्पा बळवंत चौक ते मोती चौक, टिळक रोड : एस. पी. कॉलेज मुख्य प्रवेशद्वार ते टिळक चौक, शास्त्री रोड : सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक एकेरी वाहतुकीच्या नियमांत तात्पुरती शिथिलता.

No Parking
Women Farmer Certificate: महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता ऑनलाइन मिळणार ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’

नागरिकांची आणि पादचाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, नाईक रस्ता आणि एम. जी. रोड परिसरातील एकेरी वाहतुकीचे नियम आवश्यकतेनुसार सायंकाळी ५ नंतर तात्पुरत्या स्वरूपात शिथिल केले जातील.

No Parking
Sugarcane Crushing Season: यंदा कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पळवापळवीची शक्यता; साखर गाळपासाठी १२७ प्रस्ताव ऑनलाइन प्रणालीवर दाखल

फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि पोलिस वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना बंद रस्त्यांवरून प्रवेशासाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news