Pune News : कंटेनर उलटल्याने तिघांचा मृत्यू

Pune News : कंटेनर उलटल्याने तिघांचा मृत्यू
Published on
Updated on

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळा व खंडाळादरम्यान पोलिस प्रशिक्षण केंद्राजवळील वळणावर एक भरधाव कंटेनर उलटून त्याची दोन दुचाकींना धडक बसली. या दुर्घटनेत एक लहान मुलगी आणि दोन महिलांचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवार (11) दुपारी घडला.

कुमारी योगेश ढुमणे (वय5), लता नागेश ढुमणे (26, दोन्ही रा. कोलादवाडी, ता. रोहा, जिल्हा रायगड) आणि सविता गणेश लायगुडे (40, रा. प्रेमनगर कुसगाव, ता. मावळ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, अनुश नागेश ढुमणे (वय दीड वर्ष) आणि गणेश सखाराम लायगुडे (45) जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. लोणावळा शहरात मोठ्या आणि अवजड वाहनांमुळे सातत्याने होणार्‍या अपघाताच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर शहरातून अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र, असे असतानाही अपघातग्रस्त कंटेनर (एमएच 04 जेयू 9488) लोणावळा शहरातून याच मार्गाने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या अलीकडे हॉटेल राज ढाबा याठिकाणी उतार व वळणावर कंटेनर उलटला व घसरत पुढे जाऊन लोणावळ्याच्या दिशेने येणार्‍या दोन दुचाकी गाड्यांना त्याची धडक बसली. या अपघातात एक लहान मुलगी व दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक लहान मूल व दोघेजण जखमी झाले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news