Shivneri Land Jihad : शिवनेरीच्या पायथ्याशी ‘लँड जिहाद’; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Shivneri Fort: या संदर्भात पोलीस व महसूल विभागाला उपग्रह छायाचित्रे (सॅटेलाइट इमेजेस) तसेच गुगल मॅप्सच्या माध्यमातून पुरावे देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले
Shivneri Land Jihad : शिवनेरीच्या पायथ्याशी ‘लँड जिहाद’; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
Published on
Updated on

Alleged Land Jihad Case Near Shivneri Fort Kirit Somaiya

नारायणगाव : शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या कथित बांधकामावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रशासनावर टीका केली. किल्ल्याच्या परिसरात ‘लँड जिहाद’ सुरू असल्याचा आरोप करत, "प्रशासन व पुरातत्त्व विभागाने तातडीने योग्य ती कारवाई करावी; आठवडाभरात कारवाई न झाल्यास हिंदू संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि त्यात आपण स्वतः सहभागी होऊ," असा इशारा सोमय्या यांनी सोमवारी (दि. ७) दिला.

सोमय्या यांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी भेट देऊन संबंधित कामाची पाहणी केली. या वेळी प्रशासन तसेच पुरातत्त्व विभागाने याबाबत वेळेवर दखल का घेतली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "किल्ल्याच्या पायथ्याशी भावना भडकवणाऱ्या प्रकारांना प्रशासन साथ देत आहे का?" असा प्रतिप्रश्नही त्यांनी विचारला.

Shivneri Land Jihad : शिवनेरीच्या पायथ्याशी ‘लँड जिहाद’; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
Radha Patil: प्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटीलवर पुण्यात गुन्हा दाखल; दहीहंडी कार्यक्रमावरून आयोजकही अडचणीत, नेमकं काय घडलं?

किल्ल्यापासून शंभर मीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी नसल्याचे सांगत, या परिसरात सुरू असलेले कथित बेकायदा बांधकाम तातडीने हटवावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली. गेल्या दोन-चार वर्षांत शिवनेरी परिसरात बांधकामे झाल्याची माहिती प्रशासनाला देऊनही कारवाई झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दर्गा व कब्रस्तान असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. "शिवनेरी किल्ल्याच्या शंभर मीटरच्या परिसरात अशा प्रकारचे चुकीचे प्रकार होऊ देणार नाही," असे ते म्हणाले.

या संदर्भात पोलीस व महसूल विभागाला उपग्रह छायाचित्रे (सॅटेलाइट इमेजेस) तसेच गुगल मॅप्सच्या माध्यमातून पुरावे देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. सन २०१२ ते २०१८ या कालावधीत या ठिकाणी अशा प्रकारचे कोणतेही बांधकाम नव्हते, याचे पुरावे प्रशासनाला दिल्याचा दावाही त्यांनी केला.

Shivneri Land Jihad : शिवनेरीच्या पायथ्याशी ‘लँड जिहाद’; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
Pune Dahi Handi Noise Pollution: पुण्यात दहीहंडीचा डीजेचा दणदणाट कमी; १,१०० मंडळांचे ‘साउंड रीडिंग’, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

या प्रकरणी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या जातील, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले. पुरातत्त्व विभाग, वन विभाग, महसूल विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणी कारवाई का केली नाही, याची चौकशी करण्यात येणार असून पुरातत्त्व विभागाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. संबंधित बांधकाम झालेले ठिकाण एका हिंदू व्यक्तीच्या मालकीचे असल्याचेही त्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले.

या वेळी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खैरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, संघ प्रचारक ॲड. सुनील काळे, हर्षवर्धन कुऱ्हे, वैभव परदेशी, सूरज खत्री, नंदकुमार तांबोळी, सचिन खत्री, ऋषिकेश ताजणे, प्रशांत ठाकूर, मयूर तुळे तसेच तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news