Imtiaz Jaleel News: शेतकरी दुष्काळाच्या संकटात होरपळतोय अन् शिरूरमध्ये कव्वालीत नोटांची उधळण; जलील यांचा Video Viral

maharashtra drought : शिरूर तालुक्यात पाण्यासाठी वणवण
Syed Imtiaz Jaleel.
Syed Imtiaz Jaleel.Pudhari
Published on: 
Updated on: 

Syed Imtiaz Jaleel Viral Video

तुषार झरेकर, शिरूर : पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागांत यंदा पावसाअभावी दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून बळीराजा हवालदिल झाला आहे. असे असतानाच शिरूर येथे आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमात थेट नोटांची उधळण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे 'एमआयएम'चे (AIMIM) ज्येष्ठ नेते इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला असून, त्यांच्यावर पैशांची उधळण होत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शिरूर तालुक्यात यंदा दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. विहिरींनी तळ गाठला असून पिके करपून गेल्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेचा सामना करत आहेत. अशा नाजूक आणि बिकट परिस्थितीत शिरूरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम रंगला होता. या कार्यक्रमाला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी हजेरी लावली होती. कव्वाली सुरू असताना उत्साहाच्या भरात काही उपस्थितांनी जलील यांच्यावर नोटांची उधळण सुरू केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

Syed Imtiaz Jaleel.
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी ७६ टक्के जमीन ताब्यात; उर्वरित शेतकऱ्यांना १० ऑक्टोबरपर्यंत मुदत

एकीकडे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे सार्वजनिक व्यासपीठावर पैशांची उधळपट्टी करणे कितपत योग्य आहे? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवरून जोरदार चर्चा झडत असून अनेक युजर्सनी नेत्यांच्या अशा वागणुकीवर आणि कार्यक्रमातील बेफिकीर खर्चावर कडक शब्दांत टीका केली आहे.

Syed Imtiaz Jaleel.
AI Quantum Technology Insurance: AI आणि क्वांटम तंत्रज्ञानामुळे विमा क्षेत्रात मोठे बदल; राष्ट्रीय विमा अकादमीच्या शिखर संमेलनात सायबर सुरक्षेवर भर

दरम्यान, इम्तियाज जलील यांच्यावर कव्वालीच्या कार्यक्रमात नोटा उधळण्याचा हा पहिलाच प्रसंग नसून, यापूर्वीही अशाच एका घटनेवरून वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्यामुळे संतापाची लाट पसरली असून राजकीय वर्तुळातही यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news