आम्ही सकाळच्या वेळी कामाच्या घाईत असताना अचानक घरात सांडपाणी शिरल्याने काहीच सुचेनासे झाले. . गेल्या तीन दिवसांपासून सकाळी पाणी सुटताना व सायंकाळच्या वेळी ड्रेनेज तुंबल्याने घरात सांडपाणी शिरत आहेत. यामुळे आम्हाला कामावर जाता येत नाही.
-रेखा कदम, रहिवासी
महापालिकेने डायस प्लॉट, इंदिरानगर व गुलटेकडी भागातील झोपडपट्ट्यांमधील ड्रेनेज लाईन व स्वच्छतागृहांचीही देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या त्वरित
बदलण्यात याव्यात.
– गणेश शेरला, अध्यक्ष, एकता प्रतिष्ठान
शनिवारी सकाळी झोपडपट्टीतील तीन, चार घरांत व दोन गल्लीमध्ये सांडपाणी शिरल्याचे समजले आहे. त्या ठिकाणी तातडीने कर्मचारी पाठवून ड्रेनेज लाईनची सफाई करण्यात आली आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.
-राजेश फटाले, साहाय्यक अभियंता