Pune News : हवेलीतील कुणबी नोंदी मराठीत प्रकाशित करा

Pune News : हवेलीतील कुणबी नोंदी मराठीत प्रकाशित करा
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्यातील सिंहगड-पश्चिम हवेली भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तहसील कार्यालयातील दप्तरातील जन्म-मृत्यू रजिस्टर, तसेच महसूल व इतर ठिकाणच्या दस्तऐवजांतही मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी असल्याने सर्व नोंदी मराठीत प्रकाशित करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.सिंहगड भागातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जुन्या शाळांतील कुणबी नोंदी शोधण्यासाठी पुढे आले आहेत. लक्ष्मण माताळे, बाजीराव पारगे आदींनी डोणजे येथील जिल्हा परिषद शाळेतील कुणबी नोंदींची माहिती घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हारगे यांनी सुटीतही कार्यकर्त्यांना माहिती दिली.

सिंहगड भागातील डोणजे येथे 55, शिवापूर येथे 17, खडकवासला येथे 9, नांदेड येथे 105, गोर्‍हे बुद्रुक येथे 30, कोंढापूर येथे 34 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. इतरही शाळांमध्ये कुणबी नोंदी आहेत. बि—टिश राजवटीत या गावात मराठी शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळेच्या विद्यार्थ्यी दाखल रजिस्टरमध्ये कुणबी नोंदींचा उल्लेख असल्याने या रजिस्टरना महत्त्व प्राप्त झाले आहे.जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये 1830 पासून 1930 पर्यंत बहुतेक गावात सरसकट मराठ्यांच्या जातीचा उल्लेख मकुणबीफ म्हणून आहे. काही ठिकाणी जातीच्या पुढे ममराठाफ असा उल्लेख असल्याचे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते लक्षण माताळे यांनी सांगितले.

नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष सज्ज

हवेली तालुक्यातील गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्येही मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडत आहेत. याशिवाय सनद, वतन आदी ऐतिहासिक दस्ताऐवजांसह बि—टिश राजवटीतील जनगणना, गॅझेट, महसुली दप्तर आदींमध्येही कुणबी नोंदीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष सज्ज झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news