

मुंढवा येथे अनेक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक लागले आहेत. यावर ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. पालिकेने कोणालाही पाठीशी न घालता सरसकट कारवाई करणे आवश्यक आहे.– शिवाजी पवार, हवेली तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेडअनधिकृत बोर्ड व बॅनर कुठे असतील तर त्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल.– बाळासाहेब ढवळे पाटील,सहायक आयुक्त, हडपसरक्षेत्रीय कार्यालय