Pune News : भोसले मैदानात सुविधांनी घेतली असुविधांची जागा! 

Pune News : भोसले मैदानात सुविधांनी घेतली असुविधांची जागा! 
हडपसर : पुढारी वृत्तसेवा : अमर कॉटेज परिसरात महापालिकेच्या भोसले मैदानाची दुरवस्था झाली आहे. हे मैदान खासगी भाडेतत्त्वावर दिले जात असल्याने त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. महापालिका, हडपसर क्षेत्रीय कार्यालय आणि क्रीडा विभागात समन्वयाचा अभाव असल्याने हे मैदान विविध समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
या मैदानाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. परिसरात गवत मैदानातील स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव आहे तसेच स्वच्छतागृहांची दररोज साफसफाई होणे गरजेचे आहे. सुरक्षेतेच्या दृष्टीने मैदानाला गेट बसविणे गरजेचे आहे. तसेच मैदानात गवत अस्ताव्यस्त वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
हे मैदान महापालिकेचे मालमत्ता विभागाच्या अंतर्गत येत असून, त्याच्या देखभाल व दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे एकही प्रश्न सुटला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. आरोग्य निरीक्षक स्वच्छता विभागाच्या नावाखाली काम केल्याचा देखावा करतात. मात्र, वर्षानुवर्षे येथील समस्या कायम आहे.  मैदान परिसरात दिवस व रात्र मद्यपी व गांजा, चरस आदी व्यसनाधीन लोकांचा वावर असतो तसेच तरुण- तरुणी याठिकाणी अश्लील चाळे करत बसलेले असतात.
हे मैदान खासगी कार्यक्रमांसह फटाके स्टॉल, गणपती मूर्तीच्या स्टॉलसाठी भाडेतत्त्वावर दिले जात असून, त्या माध्यमातून वर्षभर लाखो रुपयांचा महसूल प्रशासन गोळा करीत आहे. मात्र, मैदानाच्या देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मैदान परिसरातील अस्वच्छतेत व्यावसायिकांना नाइलाजाने आला व्यवसाय करावा लागत आहे. पालिकेचे अधिकारी केवळ पावत्या फाडण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र, मैदानाच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
भोसले मैदानात ज्येष्ठ नागरिक सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी येतात तसेच तरुणदेखील व्यायामासाठी येत असतात. मात्र, या मैदानाला सध्या विविध समस्यांचा विळखा पडला असून, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिक हतबल झाले आहेत.
-जावेद मुलाणी, दीपक अमृतकर, नागरिक.
या मैदानाची स्वच्छता करण्याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात आला आहे. आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.
-बाळासाहेब ढवळे, सहायक आयुक्त, हडपसर  क्षेत्रीय कार्यालय.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news