Pune News : जांभुळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Pune News : जांभुळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील नवले पूल , दरी पूल तसेच भुमकर चौक या ठिकाणावर होणाऱ्या अपघातांचं जणू सत्रच सुरू आहे.
अपघातांची साखळी थांबायचं नाव घेत नाही. महिना असो वा आठवडा या तीन पुलांपैकी कुठे ना कुठेतरी अपघात होतच असतात हे ऐकायला मिळतं. पुन्हा याचाच प्रत्यय आज पहाटे ४ च्या दरम्यान पुण्यातल्या जांभुळवाडी येथील दरी पुलावर आला. चार वाहनांचा एकत्र अपघात झाला आहे. मोठा कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो एका लक्झरी बसला जाऊन धडकलयासोबतच तो पुढे टेम्पो व एका चारचाकीला जाऊन धडकला. त्यानंतर कंटेनर थेट डिव्हायडरवर अक्षरशः आदळला.

हाती आलेल्या माहितीनुसार आज पहाटे चारच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळालेल्या माहिती नुसार जांभळवाडी येथील दरी पुलावर एक कंटेनरने तीन वाहनांना धडक दिली असून अपघात झाला आहे आणि अपघाताची भीषणता मोठी आहे. ही माहिती मिळताच अग्निशमन विभाग तसेच पीएमआरडी अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झालेत. त्यानंतर युद्धपातळीवर अपघातात अडकलेल्या बाहेर काढण्याच काम सुरु झालं. त्यात दोन नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अपघातात चार गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या दरम्यान मात्र या भीषण अपघात कंटेनर चालक आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अद्याप मात्र त्यांची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन करीत आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news