

Twelve minutes of thrill: Firefighter saves life of little girl hanging from window
पुणे: तिसर्या मजल्यावरील सदनिकेच्या खिडकीतून लोंबकळत असलेल्या चार वर्षाच्या चिमुरडीचे प्राण एका अग्निशन जवानाने वाचवले. प्रत्यक्षात जवानाची सुटी असतानाही तो देवदुतासारखा धावून आल्याने व त्याने मुलीचे प्राण वाचिल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
अग्निशमन जवान योगेश चव्हाण असे त्यांचे नाव आहे. त्यांनी भाविका चांदणे या चार वर्षाच्या मुलीचे प्राण वाचवत मोठा अनर्थ टाळला. माहितीनुसार, तांडेल योगेश चव्हाण हे कोथरूड येथील अग्निशन दलात कार्यरत आहेत. तर ते सध्या गुजर निंबाळकरवाडी येथील खोपडेनगर येथे राहण्यास आहेत.
मंगळवारी (दि. ८) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पेपर वाचत असताना त्यांना बाहेर उमेश सुतार नावाचा व्यक्ती ओरडताना दिसला. त्यांचा आवाज ऐकून चव्हाण घराबाहेर गॅलरीत आले. तेव्हा त्यांना सोनवणे बिल्डींग येथील तिसर्या मजल्यावरील सदनिकेच्यास खिडकीतून एक चार वर्षाची मुलगी लोंबकळलेली दिसली. जिवाच्या आकांताने ती मुलगी पुन्हा खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न करत होती.
यावेळी चव्हाण यांनी एकाही क्षणाचा विलंब न करता सोनवणे बिल्डींगकडे धाव घेतली. ते लागलीच बिल्डींगच्या तिसर्या माळ्यावर पोहचले. तेव्हा त्यांना समजले संबंधीत मुलीची आई तिला घरात बंद करून दुसर्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली असल्याचे समजले. त्याही मुलीला सोडून परत येत होते. त्यावेळेस चव्हाण तेथे पोहचले. तत्काळ घराचा दरवाजा उघडून मुलीला बेडरूमच्या खिडकीतून घरात खेचले. अन तिचा जीव वाचविला. हा थरार तब्बल १० ते १२ मिनिट सुरू होता. मुलगी एवढा वेळ खिडकीच्या गजांना लोंबकळून राहिली. तिनेही हिम्मत दाखविल्याने तिचा जिव वाचला. मुलीच्या आईनेही चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी जवळ राहणार्या नागरिकांची गर्दी जमली होती.