Pune News : धायरीत डीपी रस्त्यांवर अतिक्रमणांचा धोका

Pune News : धायरीत डीपी रस्त्यांवर अतिक्रमणांचा धोका

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : धायरी-सिंहगड रस्ता परिसरातील सर्व मंजूर डीपी रस्ते तातडीने करण्यात यावेत. या रस्त्यांना दिरंगाई झाल्यास मोठ्या अतिक्रमणे होण्याची भीती धायरीकरांनी व्यक्त केली आहे. धायरी येथील सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता या डीपी रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याबरोबर इतर तीनही रस्ते करण्यात यावेत अन्यथा या रस्त्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होण्याची शक्यता असल्याचे मत आम आदमी पक्षाचे (आप) शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांनी व्यक्त केले आहे.

बेनकर, तसेच 'आप'चे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, सुनीता भोसले आदींसह नागरिकांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार व पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अमर शिंदे यांना याबाबत निवेदन दिले आहे. पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अमर शिंदे म्हणाले, 'सावित्री गार्डन ते सिंहगड रोड या डीपी रस्त्याची रीतसर मोजणी होऊन प्रत्यक्ष कामाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित तीनपैकी एकच रस्ता डीपी आराखड्यात आहे. दोन रस्ते प्राकृत आराखड्यात आहेत. असे असले तरी नागरिकांनी अतिक्रमणांची शक्यता व्यक्त केल्याने या तीन रस्त्यांची आखणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू आहे.'

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news