Pune News : बालेवाडीतील मुख्य रस्त्याचे काम लवकरच होणार पूर्ण
बाणेर : पुढारी वृत्तसेवा : बालेवाडीतील लक्ष्मीमाता ते ब्राऊरीया सोसायटी मुख्य रस्त्याची अधिकार्यांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली. पुढील आठवड्यापासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असून, ते लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे या वेळी अधिकार्यांनी नागरिकांनी सांगितले.या रस्त्याची पाहणी पुणे महापालिका पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारी, शाखा अभियंता संदीप चाबुकस्वार, कनिष्ठ अभियंता धनंजय खोले, उपअभियंता मकरंद वाडेकर परिसरातील नागरिकांसमवेत केली.
'गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्यासाठी भाजपच्या माध्यमातून महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. याच मागणीला यश आले असून, पुणे मनपाने हा रस्ता विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पदपथ, पथदिवे, कॉजवे, दुभाजक अशा विविध सुविधांनी सुसज्ज असा हा रस्ता लवकरच प्रशासनाकडून विकसित करण्यात येणार आहे,' अशी माहिती माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या वेळी दिली. हा रस्ता विकसित झाल्याने निश्चितच मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटेल व नागरिकांना रहदारीसदेखील रस्ता सुकर होईल.
हा रस्ता विकसित करत असताना बाधित होत असलेल्या जागामालकांनी सहकार्य करावे. तसेच रस्त्यालगत अनधिकृत असलेल्या स्टॅाल व पत्राशेड संबंधित मालकांनी तातडीने काढून घ्याव्यात.
– दिनकर गोजारी, कार्यकारी अभियंता, पथ विभाग.
हेही वाचा

