

मंचर : पुणे-नाशिकरेल्वे मार्ग आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांतून गेलाच पाहिजे, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सरपंच, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, सर्वपक्षीय कार्यकर्ते,
विविध संघटना यांची एकत्रित बैठक मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात रविवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता आमदार तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
खेड-आंबेगाव-जुन्नर तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा आमदार तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व मी करणार आहे. या बैठकीला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.