

पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंच्या सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी संस्थेचां 120 वा वर्धापन दिनानिमित्ताने गुरुवारी 12 जून रोजी एका माजी आमदाराच्या जोरावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पदच्युत झालेले मिलिंद देशमुख दादागिरी करीत होते.त्यामुळे संचालक मंडळाने सत्रसमाप्तीच्या बैठकीत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी ही वार्षिक सभा पुणे येथील मुख्यालयात घेते. देशभरात असलेल्या केंद्रावरून संचालक मंडळ अर्थसंकल्प आणि संस्थेच्या हिताचे निर्णय घेऊन कारभार चालवतात. यंदाचे सत्र 5 ते 14 जून पर्यंत ठरवले होते.मात्र मिलिंद देशमुख यांनी पहिल्या दिवसापासून दादागिरी सुरू केल्याने विश्वस्त मंडळ हादरले.
पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यातील पोलिसांनी 5 एप्रिल 2025 रोजी भ्रष्टाचाराच्या आरोपात माजी सचिव मिलिंद देशमुखला अटक केली. त्यामुळे 11 एप्रिल 2025 रोजी त्याची सचिव पदावरून त्याची हकालपट्टी करण्यात होती. तेव्हा अध्यक्ष व सचिव म्हणून दामोदर साहू हे सत्र चालवतील असे ठरले होते. सत्र सुरू झाल्यावर देशमुख हे सचिव असल्याच्याच तोऱ्यात संचालक मंडळावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे 7 जून रोजी झालेल्या सत्रात देशमुखन कार्यकारी सदस्यांवर धावून गेले होते.
उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांनी दुःख व्यक्त करून सभात्याग केला.त्यांच्या समर्थनार्थ इतर कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी सुद्धा सभात्याग केला. अध्यक्ष साहू यांनी देशमुखवर कुठलीही संवैधानिक कारवाई केली नाही. त्यामुळे कार्यकारी मंडळ अस्वस्थ आहे. अध्यक्षांनी आजारपणाचे सोंग घेऊन दोन दिवस सत्र चालढकल केले. असा आरोप होत आहे.
युवक काँग्रेसच्या विद्यार्थांनी प्रभारी कुलगुरू डॉ.शंकर दास हटाव म्हणत आंदोलनाचा इशारा दिला. तेव्हा घाबरून ऐनवेळी दुपारी साडेतीन वाजता सत्र सुरू केले. यावेळी आजीवन सदस्य प्रवीणकुमार राऊत यांचे कित्येक वर्षाचे थकवलेले मानधन तसेच धर्मदायमध्ये नोंद करणे याकडे अध्यक्षांनी हेतुपुरस्सर दूर्लक्ष केले. त्यावर संवैधानिक पद्धतीने मागणी पत्र लिहून राऊत पाठपुरावा केला तेव्हा संचालक मंडळाने तो विषय अजेंड्यावर ठेवला तरीही देशमुख यांच्या सांगण्यावरून अध्यक्षांनी दखल घेतली नाही.असा आरोप राऊत यांनी केला आहे.
संस्थेतील भ्रष्टाचार,जमिनी विक्री, सार्वजनिक संस्था कौटुंबिक होऊ नये अशी प्रकरणे बाहेर काढल्याने देशमुख यांनी प्रविणकुमार राऊत यांना ठरवून त्रास दिला.त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण करून त्यांचे आर्थिक,मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न गेले तीन वर्षे सुरू आहे.
संस्थेच्या इतिहासात गत 120 वर्षात अशी घटना प्रथमच घडल्याचे संचालक मंडळातील सदस्यांचे मत आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याच्या विरोधात काही लोकांनी निषेध करणारे बॅनर संस्थेच्या आवारात लावले तेव्हा देशमुख यांनीं ते बॅनर रात्रीच्या अंधारात गायब केल्याचे दबक्यात बोलले जात आहे.
देशमुख हे रानडे ट्रस्टची हडपसर परिसरातील जमिन हडपण्याप्रकरणी एका माजी आमदाराना सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे सदस्य करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले, त्यांच्या जोरावरच देशमुख संस्थेत दादागिरी करीत आहेत.त्यामुळे संचालक मंडळाने समारोपाच्या बैठकीत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
-प्रविणकुमार राऊत,आजीवन सदस्य,सर्व्हनट्स ऑफ इंडिया