

पुणे : स्पीड व्हील्स स्केटिंग क्लबच्या स्केटर्सनी पुणे जिल्हा रोलर हॉकी स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य दाखविले. या खेळाडूंनी आगामी राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. ही स्पर्धा 7 ते 12 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या खेळाडूंनी प्रशिक्षक अभिजित चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. (Latest Pune News)
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू ः टायनी टॉट्स गट: आहेन मैत्रम, कॅडेट्स गट: निकुंज घोरपडे, सर्वेश परशुराम, हर्षित गुप्ता, दक्ष जयराज. सब-ज्युनिअर मुलांचा गट : समर्थ राजकुमार, आयुष नळावडे, अर्चित भोसलें, मोहम्मद अझीझ, श्रिसंत कलाटे. सब-ज्युनिअर मुलींचा गट: ईरा भांडारकर, साधना पलनीवेल.