Pune Nagpur Special Train: लाँग विकेंडला पुण्याहून नागपूरला जाताय? रेल्वे चालवणार विशेष ट्रेन, माहिती वाचा

मध्य रेल्वे पुणे विभागाचा निर्णय; 23 व 24 जानेवारी 2026 रोजी प्रत्येकी एक फेरी
Indian Railway
Indian Railwayfile photo
Published on
Updated on

पुणे: विकेंडच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, मध्य रेल्वे पुणे विभागाने पुणे ते नागपूरदरम्यान विशेष शुल्कासह एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Indian Railway
Pimpri Chinchwad PC Shield App: ‘पीसी शील्ड’ ॲपमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये 1,585 सराईत गुन्हेगारांचे मॅपिंग पूर्ण

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01467 /01468 पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट या दोन्ही विशेष गाड्यांची आठवड्याला प्रत्येकी एक फेरी होणार आहे. तसेच, ट्रेन क्रमांक 01467 पुणे-नागपूर विशेष शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी पुण्यातून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजून 30 मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल.

Indian Railway
Maharashtra RKVY Grant: आरकेव्हीवायअंतर्गत महाराष्ट्राला 2026-27 साठी 1,256 कोटींचे अनुदान मंजूर

तसेच, ट्रेन क्रमांक 01468 नागपूर-पुणे विशेष शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी नागपूर येथून सकाळी 8 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी पुणे येथे पोहोचेल.

Indian Railway
MPed MEd CET 2026: एमपीएड–एमएड सीईटी 2026 नोंदणीस 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

दरम्यान, ही गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या ठिकाणी थांबे घेईल, या गाडीमध्ये एकूण 20 डबे असणार आहेत.

Indian Railway
Saswad Jowar Price: सासवड उपबाजारात ज्वारीला विक्रमी 4,451 रुपयांचा दर

2 वातानुकूलित 2-टायर, 4 वातानुकूलित 3-टायर, 8 स्लीपर क्लास, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 जनरेटर व्हॅन आणि 1 गार्ड बेक व्हॅन, अशी डब्यांची संरचना असणार आहे. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news