Pune Nagar Road Potholes: नगर रोड परिसरातील रस्त्यांची पावसात दुर्दशा; खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

कल्याणीनगर, विमाननगर, वडगाव शेरी, चंदननगरमध्ये अपघाताचा धोका वाढला; निकृष्ट कामांच्या चौकशीची मागणी
Pune Nagar Road Potholes
Pune Nagar Road PotholesPudhari
Published on
Updated on

वडगाव शेरी: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नगररोडसह परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पुणे-नगर महामार्गासह कल्याणीनगर, विमाननगर, वडगाव शेरी आणि चंदननगर परिसरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, वाहतूक कोंडीसह अपघातही होत आहेत.

Pune Nagar Road Potholes
Sant Tukaram Maharaj Palkhi: पाटस भक्तीरंगात न्हाऊन निघाले; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत

नगर रोड, शास्त्रीनगर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, पंपिंग स्टेशन परिसर, टाटा गार्डन, सोमनाथनगर, गणेशनगर, जुना मुंढवा रस्ता, वडगाव शेरी तसेच चंदननगरमधील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण उखडले असून वाळू, खडी आणि उंचसखल पृष्ठभागामुळे वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. दुचाकीस्वारांना वारंवार धक्के बसत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

Pune Nagar Road Potholes
Sant Tukaram Maharaj Palkhi: वरवंडकरांचा तुकोबारायांच्या पालखीला भावपूर्ण निरोप; दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी बारामतीकडे रवाना

महापालिकेने काही ठिकाणी डांबर टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पावसामुळे त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. कल्याणीनगर आणि विमाननगर परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर मॅनहोलच्या आजूबाजूला खड्डे निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नसल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व धोकादायक मॅनहोल आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Pune Nagar Road Potholes
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala: पाच नाथांच्या साक्षीने दौंड तालुका भक्तीरंगात; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

एकाच पावसाने रस्त्यांची लागली वाट! पावसामुळे रस्त्यांच्या कडेला वाळू साचली असून, त्यामुळे दुचाकी घसरण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. महापालिकेने केलेल्या रस्त्यांची गुणवत्ता निकृष्ट असल्याने एका पावसाने रस्त्याची वाट लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेषतः जुना मुंढवा रस्ता गेल्या वर्षभरापासून खड्डेमय असून, वारंवार दुरुस्ती करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

Pune Nagar Road Potholes
Pune Protest Permission Rules: पुण्यात परवानगीशिवाय आंदोलनाला ब्रेक; एफसी रोड, जेएम रोडसह प्रमुख चौकांवर पोलिसांचा कडक नियम

रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्याची मागणी

नगर रोड परिसरातील काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ॲड. सतीश माने यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच, नगर रोडसह परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्त करावी, या मागणीचे निवदेन श्री तुकाई माता सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद देवकर यांनीही आयुक्तांना दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news