Pune Property Tax Services: पुणे महापालिकेच्या करसंकलनाला ‘एसआयआर’चा फटका; मालमत्ता कराच्या कामांना विलंब

मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामावर; अर्ज, करसेवा अन् प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावला
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा करण्याची जबाबदारी असलेल्या कर आकारणी व करसंकलन विभागातील मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी सध्या निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आल्याने विभागाच्या नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे. 'निवडणूक एसआयआर २०२६'च्या विशेष निवडणूक कामकाजासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याने मालमत्ता कराशी संबंधित विविध अर्ज, सेवा आणि प्रशासकीय कामांचा निपटारा करण्यास विलंब होत आहे.

Property Tax
Pune 24 Hour Water Supply: पुणेकरांना २४ तास पाण्याची तयारी अंतिम टप्प्यात; ६० झोनमध्ये पुढील महिन्यापासून मीटर रीडिंग!

निवडणूककामासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने करसंकलन विभागातील दैनंदिन कामकाजाचा वेग मंदावला आहे. मालमत्ता करासंदर्भातील कामांसाठी महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत असून, विविध सेवा आणि अर्ज पूर्ण होण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. या परिस्थितीची दखल घेत महापालिका प्रशासनाने नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

Property Tax
Pune World Class Footpaths: पुण्यात खड्डे बुजविण्याआधी ‘जागतिक दर्जाचे फुटपाथ’ कशासाठी?; ८८ कोटींच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह

उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून नागरिकांना शक्य तितक्या तत्परतेने सेवा देण्यासाठी विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 'निवडणूक एसआयआर २०२६'चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर कर आकारणी व करसंकलन विभागातील नियमित कामकाज पूर्ववत करण्यात येणार आहे. तोपर्यंत सेवा देताना होणारा विलंब टाळण्यासाठी उपलब्ध कर्मचारी व मनुष्यबळाचा योग्य पद्धतीने वापर केला जात आहे.

Property Tax
Pune Coconut Market: पुण्यात वर्षाला सात कोटी नारळांची विक्री; ८० ते १०० कोटींची उलाढाल!

नागरिकांना दिलासा कधी?

  • करसंकलन विभागातील मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामावर

  • मालमत्ता कराशी संबंधित अर्जांच्या निपटाऱ्यास विलंब

  • विविध करसेवा व प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावला

  • उपलब्ध मनुष्यबळातून सेवा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

  • निवडणूक काम पूर्ण झाल्यानंतर नियमित कामकाज पूर्ववत होणार

Property Tax
Maanas Sutra Initiative: विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मानस सूत्र’; राज्यातील महाविद्यालयांत १,२३१ समुपदेशकांची नियुक्ती

'निवडणूक एसआयआर २०२६'च्या कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने नियमित कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. नागरिकांना होणाऱ्या विलंबाबद्दल प्रशासन दिलगीर आहे. उपलब्ध मनुष्यबळातून सेवा शक्य तितक्या तत्परतेने देण्याचा प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सहकार्य व संयम बाळगावा.

रवी पवार, कर आकारणी व करसंकलन विभागप्रमुख, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news