Pune municipal election
प्रभागांच्या तोडफोडीमुळे कहीं खुशी कहीं गम! प्रभागरचनेवरून चर्चांना उधाणPudhari

Pune municipal election: प्रभागांच्या तोडफोडीमुळे कहीं खुशी कहीं गम! प्रभागरचनेवरून चर्चांना उधाण

शहरातील राजकीय वातावरणात ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
Published on

पुणे: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना शुक्रवारी अखेर जाहीर झाली. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, नव्या रचनेत अनेक प्रभागांचे नकाशे बदलले गेल्याने काहींना आनंद, तर काही पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी, शहरातील राजकीय वातावरणात ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

शुक्रवारी महापालिका आयुक्त व प्रशासक नवल किशोर राम यांनी सायंकाळी 7 वाजता ही रचना जाहीर केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज एम. पी., ओमप्रकाश दिवटे, प्रदीप चंद्रन एम. जे. आणि उपायुक्त प्रसाद काटकर उपस्थित होते. जाहीर केलेल्या प्रारूपानुसार, पुणे शहरात एकूण 41 प्रभाग असतील. (Latest Pune News)

Pune municipal election
Sahyadri Hospital: यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; पुण्यातील सह्याद्री रुग्णालयावर गंभीर आरोप

त्यापैकी 40 प्रभागांमधून प्रत्येकी चार नगरसेवक आणि एका प्रभागातून पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत. म्हणजेच, एकूण 165 नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 34 लाख 81 हजार 259 मानून ही रचना करण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 4 लाख 68 हजार 633 तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 40,687 इतकी आहे.

नाराजीची ठिणगी

2017 मध्ये प्रभागरचनेवरून मोठा गदारोळ झाला होता. या निवडणुकीतदेखील पुण्यातील प्रभागरचनेवरून राजकीय पारा वाढला आहे. महायुती सरकार असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नव्या रचनेवर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपसाठी सोयीची रचना करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे.

Pune municipal election
Maharashtra Politics: अजित पवारांच्या पक्षाची भाजपवर नाराजी; महायुतीतही उडू लागले खटके

तर शिवसेनेलाही आपले प्रभाग दुय्यम ठरल्याची खंत आहे. या प्रभागरचेनवर 4 सप्टेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर होईल. त्यामुळे नागरिक आणि इच्छुक उमेदवार यांच्यात प्रभाग नकाशांचा बारकाईने अभ्यास सुरू झाला आहे.

उपनगरांत मोठे बदल

नव्या परिसीमनात पुण्यातील 23 समाविष्ट गावे जवळच्या प्रभागांमध्ये जोडण्यात आली आहेत. त्यामुळे उपनगरांमध्ये मोठे बदल घडले असून, काही प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने तोडल्याचा आरोप होत आहे. यात आंबेगाव-कात्रज (प्रभाग क्रमांक 38) हा सर्वांत मोठा प्रभाग ठरला असून, त्याची लोकसंख्या तब्बल 1 लाख 14 हजार 970 आहे. तर काही प्रभाग लोकसंख्येच्या तुलनेत लहान असल्याने असंतोष वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news