PMC Election Campaign: आरक्षण सोडतीनंतर पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर प्रचाराचा पूर

इच्छुक उमेदवारांकडून फेसबुक, व्हॉट्सअँप, इन्स्टाग्रामवर प्रचारपोस्ट, व्हिडीओंचा वर्षाव — औपचारिक निवडणुकीपूर्वीच शहरात रंगली डिजिटल मोहीम
आरक्षण सोडतीनंतर पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर प्रचाराचा पूर
आरक्षण सोडतीनंतर पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर प्रचाराचा पूरFile Photo
Published on
Updated on

पुणे : महापालिका निवडणुकांसाठीची आरक्षणाची सोडत जाहीर होताच मंगळवारी शहरातील राजकीय वातावरण चैतन्यमय झाले. सोडतीनंतर विविध प्रभागांमध्ये आरक्षण निश्चित होताच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची चाके फिरवण्यास सुरुवात केली. या वेळी सोशल मीडियावर उमेदवारांच्या नावासह समर्थनाच्या पोस्ट, बॅनर, शुभेच्छा संदेशांचा वर्षाव झाल्याचे दिसून आले.(Latest Pune News)

आरक्षण सोडतीनंतर पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर प्रचाराचा पूर
PMC Draw: आठ वर्षांनी अखेर वाजली महापालिका आरक्षण सोडतीची घंटा; गणेश कला केंद्रात रंगली ‘सोडत शाळा’

व्हॉट्‌‍सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून मतदारांपर्यंत पोहचण्याची चढाओढ सुरू झाली. प्रभागातील आरक्षण निश्चित झाल्याने उमेदवारीचा मार्ग सुकर झाल्याने सर्वपक्षीय इच्छुकांनी नि:श्वास सोडत सोशल मीडियावर प्रचाराचा नारळ फोडला. आपला माणूस, जनतेच्या मनातील नगरसेवक, भावी नगरसेवक, आपल्या हक्काचा माणूस, अपकमिंग कॉर्पोरेटर आदी आशयाचे छायाचित्र तसेच व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले. याद्वारे आपण इच्छुक असल्याचे जाहीर करीत आपली कामे व आगामी योजना मांडल्या, तर काहींनी संवाद साधून जनतेशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. सोडतीनंतर शहरात जणू प्रचाराचा नारळ फुटल्याची वातावरणनिर्मतीि झाली असून, औपचारिक निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियावरील उमेदवारांच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून आले.

आरक्षण सोडतीनंतर पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर प्रचाराचा पूर
PMC Election History: आता व्होटबँक विसरा! पुण्यात बदलतोय मतदारांचा राजकीय समीकरणांचा खेळ

सोडत जाहीर होताच उमेदवार सोशल मीडियावर सक्रिय झालेत. त्यांच्या कल्पना, योजना, कामे लोकांसमोर त्वरित येत असल्याने माहिती मिळायला सोपे झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात लोकांमध्ये जाऊन संवाद साधणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

ॲड. आनंद धोत्रे, रहिवासी, शुक्रवार पेठ

सोशल मीडियावरील प्रचारामुळे परिसरातील नवीन चेहऱ्यांची ओळख झाली. पण, फक्त व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून चालणार नाही. प्रत्यक्ष काम करणारे आणि लोकांसाठी उपलब्ध राहणारे उमेदवार आम्हाला हवेत.

सचिन डेंगळे, रहिवासी, विमाननगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news