

पुणे: राज्यात महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत पुण्यात चौरंगी लढत बघायला मिळत आहेत. मतदानासाठी अवघे दोन दिवस बाकी असताना पुणे महापालिकेने पीएमपीएमलच्या संर्दभात एक महत्तावा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पीएमपीएमलच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
पुणे शहारात मोठ्या प्रमाणात पीएमपीएमल बसचा वापर दररोज केला जातो. अशा परिस्थितीत आगामी मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने पीएमपीएमलच्या बसेसचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतपेट्यांची ने-आण करायला पीएमपीएमलच्या १०५६ बसेसचा वापर केला जाणार आहे.
त्यामुळे १४ आणि १५ जानेवारीला काही मार्गावर बस कमी प्रमाणात उपलब्ध असतील. ज्याने बस उशिरा येणे किंवा फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे पीएमपीएमलच्या प्रवाशांना फटका बसू शकतो.
बसचे प्रमाण कमी असल्याने शक्य असल्यास वेळेचे नियोजन आधी करा किंवा पर्यायी बसचा वापर करावा. गर्दी टाळण्यासाठी लवकर निघा किंवा पर्यायी वेळ निवडा. शक्य असल्यास दुसऱ्या वाहनांचा वापर करा.
पीएमपीएमचा वापर करणारे मुख्य प्रवासी विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक असतात. कुठल्याही प्रकारची गैरसोय किंवा त्रास होऊ नये म्हणुन परिवहन महामंडळाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.