Pune Pedestrian Path Advertisement: पुणेकरांना पदपथ वापरण्याचा उपदेश; महापालिकेच्या जाहिरातीत मात्र पिंपरी-चिंचवडच्या पदपथाचा ‘उधार’ फोटो!

शहरात कोट्यवधींचा खर्च करूनही जाहिरातीसाठी पुण्यातील एकही आदर्श पदपथ सापडेना; पथ विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Pune Pedestrian Path Advertisement
Pune Pedestrian Path AdvertisementPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणेकरांना 'पादचारी मार्गाचा योग्य वापर' करण्याचा सल्ला देणाऱ्या पुणे महापालिकेलाच मात्र आपल्या शहरातील एकही पदपथ जाहिरातीत दाखवण्याजोगा वाटला नाही. नागरिकांना सिव्हिक सेन्सची माहिती देण्यासाठी 'असावा एक छंद, पादचारी मार्गाचा योग्य वापर करण्याचा' असा संदेश देत महापालिकेच्या पथ विभागाने समाजमाध्यमांवर जाहिरात झळकवली; मात्र, या जाहिरातीसाठी पुण्यातील पदपथांचा फोटो वापरण्याएवजी थेट पिंपरी-चिंचवडमधील पदपथाची 'उधारी' घ्यावी लागली. पुण्यात पदपथांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना महापालिकेला स्वतःच्या शहरातील एकही आदर्श पदपथ दाखवता येत नाही, हेच या जाहिरातीने सिद्ध करीत महापालिकेच्या पदपथ विभागाच्या कामकाजाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

Pune Pedestrian Path Advertisement
Pune Ganesh Idols Abroad: पुण्याच्या बाप्पाला परदेशातही मागणी; ऑस्ट्रेलिया, अमेरिका, थायलंडसह अनेक देशांत गणेशमूर्ती रवाना

नागरिकांनी पदपथांचा योग्य वापर करावा, यासाठी देखील जाहिरात केली आहे. शहरात गेल्या काही वर्षांत पदपथांच्या सुशोभीकरणावर आणि पुनर्बांधणीवर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. विविध रस्त्यांवर नव्याने पदपथ उभारणे, फरशा बसवणे, सायकल ट्रॅक, लँडस्केपिंग, अडथळे, दिशादर्शक फलक आदींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. मात्र, एवढा खर्च करूनही नागरिकांना दाखवण्यासाठी महापालिकेच्या जाहिरातीत पुण्यातील पदपथाचा फोटोच उपलब्ध नसणे, हीच या कामांची गुणवत्ता आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरली आहे.

Pune Pedestrian Path Advertisement
Maharashtra Dengue Cases: राज्यात डेंग्यूचा डंख वाढला; आठ महिन्यांत ५,५५८ रुग्णांची नोंद

प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत सायकलस्वार, पादचारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीचे पदपथ, सुशोभीकरण आणि शिस्तबद्ध वाहतूकव्यवस्था असलेली छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. मात्र, हीच दृश्ये पुण्यातील असल्याचा आभास निर्माण करून ती महापालिकेच्या प्रचारासाठी वापरल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

Pune Pedestrian Path Advertisement
Farmer Loan Waiver Aadhaar Authentication: ज्येष्ठ शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणात दिलासा; कर्जमुक्तीसाठी विशेष प्रक्रिया

शहरातील अनेक पदपथांची दुरवस्था

पुण्यातील अनेक पदपथ आजही अतिक्रमण, पार्किंग, हातगाड्या, फेरीवाले, विद्युतपेट्या, खांब, उघडी बांधकामे आणि रस्त्याच्या कामांमुळे नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत. अनेक ठिकाणी पदपथ तयार केल्यावर काही दिवसांतच त्यावर पुन्हा अतिक्रमण होते. काही ठिकाणी पदपथांची कामे अर्धवट असून, फरशा तुटलेल्या किंवा उखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरूनच चालण्याची वेळ येते. एकीकडे 'पादचारी मार्गाचा योग्य वापर करा' असा उपदेश आणि दुसरीकडे पुण्यातील प्रत्यक्ष पदपथ दाखवण्याऐवजी शेजारच्या शहरातील चांगल्या पदपथांचा आधार, या विसंगतीमुळे महापालिकेच्या पथ विभागाचा कारभार चव्‍हाट्यावर आला आहे. नागरिकांच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर शहरातील एकही पदपथ जाहिरातीसाठी आदर्श म्हणून दाखवता येत नसेल, तर पदपथांच्या कामांवर खर्च झालेला पैसा नेमका कुठे गेला? असा सवालही उपस्थित होत आहे.

Pune Pedestrian Path Advertisement
COEP Fee Revision: सीओईपीच्या शुल्कवाढीला लगाम; विद्यार्थ्यांकडून सुधारित शुल्कच घेण्याचे निर्देश

नागरिकांनी पदपथांचा वापर करावा, यासाठी 'पुणे प्रथम'अंतर्गत जाहिरात करण्यात आली आहे. ही जाहिरात करणाऱ्याने चुकीने ऑनलाइन फोटो घेतले. महापालिकेची जाहिरात करताना शहरातील पदपथांचे फोटो वापरणे अपेक्षित होते. मात्र, चुकीचे फोटो वापरल्याने ही जाहिरात बदलण्यास सांगून नव्याने करण्यास सांगितली आहे.

राजेश बनकर, पथ विभागप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news