Pune Ganesh Idols Abroad: पुण्याच्या बाप्पाला परदेशातही मागणी; ऑस्ट्रेलिया, अमेरिका, थायलंडसह अनेक देशांत गणेशमूर्ती रवाना

कुरिअरद्वारे मूर्ती पाठवण्याला वाढता प्रतिसाद; दगडूशेठ आणि कसबा गणपतीच्या मूर्तींना विशेष पसंती
Ganesh Idol
Ganesh IdolPudhari
Published on
Updated on

पुणे: मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असले, तरी गणरायाच्या आगमनाची ओढ परदेशातील मराठी माणसांच्या मनात तितकीच कायम आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिल्याने उत्सवासाठी पुण्यातून श्रीगणेश मूर्ती मागवण्याला यंदाही प्रतिसाद मिळत आहे.

Ganesh Idol
Maharashtra Dengue Cases: राज्यात डेंग्यूचा डंख वाढला; आठ महिन्यांत ५,५५८ रुग्णांची नोंद

ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, थायलंड, नॉर्वे, सिंगापूर, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्ससह विविध देशांतील मराठी भाषकांनी यंदाही पुण्याच्या बाप्पाला पसंती दिली आहे. त्यामुळे पुण्यातील मूर्तीकार आणि विक्रेत्यांकडे श्रीगणेशमूर्तींची मागणी वाढली असून, कुरिअरद्वारे परदेशात मूर्ती पाठविण्यात येत आहेत. श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या रूपातील मूर्तींना विशेष पसंती मिळत आहे.

Ganesh Idol
Farmer Loan Waiver Aadhaar Authentication: ज्येष्ठ शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणात दिलासा; कर्जमुक्तीसाठी विशेष प्रक्रिया

व्यवसाय आणि नोकरीनिमित्त विविध देशांमध्ये मराठी भाषक वास्तव्यास आहेत. ते तिथे राहूनच गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. त्यामुळेच पुण्यातून काही जण गणेशमूर्ती मागवतात. यंदाही कुरिअरद्वारे गणेशमूर्ती मागवण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच पुण्यातील मूर्तिकार आणि व्यावसायिकांकडून मूर्ती पाठवण्यास सुरुवातही झाली आहे. पीओपीसह काही प्रमाणात शाडूच्या मूर्तीही पाठविण्यात येत आहेत. विशेष पद्धतीचे बॉक्स पॅकिंग करून मूर्ती पाठवल्या जात आहेत.

Ganesh Idol
COEP Fee Revision: सीओईपीच्या शुल्कवाढीला लगाम; विद्यार्थ्यांकडून सुधारित शुल्कच घेण्याचे निर्देश

दुबई, ऑस्ट्रेलिया, नॉर्वेमध्येही मूर्ती पाठविल्या आहेत. पाच देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ३० मूर्ती पाठविण्यात आल्या आहेत. पूजेसाठी आणि सजावटीसाठी लागणाऱ्या छोट्या मूर्तींनाही मागणी आहे. परदेशातील मराठी भाषकांशी संपर्क साधण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहोत. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुमारे १२०० ते १५०० सदस्य आहेत. या माध्यमातून मूर्तींचे छायाचित्र आणि उपलब्धतेची माहिती दिली जाते. गणेशोत्सव जवळ येत असल्याने आगामी काही दिवसांत मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, असे विक्रेते सचिन डाखवे यांनी सांगितले.

Ganesh Idol
Pune Ring Road: पुणे रिंग रोडचा खर्च थेट १०,५०२ कोटींवर; सुधारित प्रशासकीय मान्यता

परदेशातून मिळणारा प्रतिसाद वाढतोय

श्रीगणेशमूर्ती विक्रेते द्वारकेश दवे म्हणाले, थायलंड आणि दुबईत गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. विशेषतः थायलंडमधील नागरिकांमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाबद्दल मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या रूपातील सात ते आठ मूर्ती थायलंडला पाठविल्या आहेत. दुबईलाही काही गणेशमूर्ती पाठविल्या असून, कुरिअरद्वारे मूर्ती पाठवत आहोत. परदेशातून मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news