Pune Municipal Corporation Meeting: पुणे महापालिका सभा अचानक तहकूब; आचारसंहिता लागू होताच गोंधळ

विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कचरा प्रश्नावरील चर्चा थांबवावी लागली; नगरसेवक आक्रमक
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सोमवारी सुरू असलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्यात आली.

Pune Municipal Corporation
Pune Garbage Crisis: पुण्यात कचरा संकट गंभीर! प्रक्रिया प्रकल्प बंद; शहरात दररोज शेकडो टन अतिरिक्त कचरा

जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आल्यावर तब्बल दोन तासांनी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवता येणार नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून सभागृहात देण्यात आली. यामुळे विरोधकांनी गदारोळ करीत सभागृहात चर्चा करता येत असल्याचे सांगत नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी, अशी भूमिका घेतली. मात्र, ही सभा तहकूब करण्यात आली.

Pune Municipal Corporation
Bhimashankar Babaji Kale Controversy: भीमाशंकर वादावर बाबाजी काळेंची भूमिका स्पष्ट; ‘मंदिर खेडमध्येच’

सोमवारी (दि. 18) सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील कचरा समस्येवर नगरसेवकांकडून चर्चा सुरू असतानाच आचारसंहिता लागू झाल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली. त्यानंतर सभागृह तहकूब करावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, कचऱ्यासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असल्याने सभेचे कामकाज सुरू ठेवावे, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी केली. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने दि. 18 मे ते 25 जून या कालावधीत महापालिका प्रशासनाला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत तसेच स्थायी समितीमध्ये निविदांशी संबंधित निर्णयांवरही निर्बंध असणार आहेत, अशी माहितीही महापौरांनी दिली.

Pune Municipal Corporation
Jejuri Bhandara Safety: जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्यावर शासनाची कारवाई; जेजुरीकरांकडून स्वागत

विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नसल्याने चर्चा सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र, विधी सल्लागार निशा चव्हाण यांनी नगरसेवक हेच मतदार असल्याने सभेतील चर्चेचाही निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट केले. त्यानंतर महापौर नागपुरे यांनी सभा तहकूब करण्याची घोषणा केली.

Pune Municipal Corporation
Purandar Sandalwood Seizure: पुरंदरमध्ये ATSची धडक कारवाई; 560 किलो चंदन जप्त

असा आहे विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 18 मे रोजी विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून असून, 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून निश्चित करण्यात आली आहे. मतदान 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून, मतमोजणी 22 जूनला केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जूनपूर्वी पूर्ण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news