Pune Nominated Corporator: पुणे महापालिकेच्या ४५ स्वीकृत नगरसेवक जागांसाठी २२५ अर्जदार पात्र; अंतिम ४५ नावांकडे लक्ष

२९८ अर्जांची छाननी पूर्ण; हडपसर-मांजरीत सर्वाधिक २७ पात्र अर्जदार, नियुक्त्यांसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता
Pune Municipal Corporation Officers
Pune Municipal Corporation OfficersPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या प्रभाग समित्यांवरील स्वीकृत नगरसेवकांच्या ४५ जागांसाठी तब्बल २२५ अर्जदार पात्र ठरले आहेत. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रशासनाकडे आलेल्या २९८ अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, पात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ४५ जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, नियुक्त्यांसाठी राजकीय पातळीवर हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Pune Municipal Corporation Officers
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांकडे इच्छुकांची गर्दी; भाजप, शिवसेना अन्‌ युगेंद्र पवारांकडूनही मोर्चेबांधणी

महापालिका प्रशासनाने स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. प्रशासनाकडे एकूण २९८ अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर २२५ अर्जदार पात्र ठरले आहेत.

Pune Municipal Corporation Officers
Loni Dhamani Onion Theft: कांद्याला भाव मिळताच चोरट्यांचा मोर्चा कांदा चाळीकडे; लोणी-धामणीत चोरीचा प्रयत्न उधळला

स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीप्रक्रियेत राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने यंदा काही कठोर अटी लागू केल्या आहेत. सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनाही या प्रक्रियेत संधी मिळावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, अटी-शर्ती कडक करण्यात आल्यानंतरही विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने अर्ज केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पात्र ठरलेल्यांची यादी जाहीर झाल्यानंतर अंतिम ४५ नावांसाठी राजकीय पातळीवर मोर्चेबांधणी होण्याची शक्यता आहे.

Pune Municipal Corporation Officers
Ketan Agrawal Case: लोहगडावर रेकी, ‘माही’च्या नावाने बनावट खाते...इंटरनेटवर ‘होमवर्क’; केतनच्या हत्याप्रकरणात नवीन माहिती उघड

प्राप्त अर्जांच्या संख्येचा विचार करता हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक २८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ विश्रामबागवाडा येथे २७, वारजे-कर्वेनगर येथे २६ आणि धनकवडी येथे २५ अर्ज प्राप्त झाले. पात्र अर्जदारांच्या संख्येत हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर असून, येथे २७ अर्जदार पात्र ठरले आहेत. धनकवडी-कात्रज-आंबेगाव येथे २२, सिंहगड रस्ता येथे २०, तर कोंढवा-उंड्री आणि वारजे-कर्वेनगर येथे प्रत्येकी १९ अर्जदार पात्र ठरले आहेत.

Pune Municipal Corporation Officers
Marriage Matchmaking Mediators: वय वाढतेय, स्थळ जुळेना; लग्न जुळविणाऱ्या मध्यस्थांना ग्रामीण भागात वाढती मागणी

स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीमध्ये राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाते, अशी टीका यापूर्वी होत आली आहे. तसेच अर्जांमध्ये चुकीची अथवा खोटी माहिती दिल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्ते आणि काही संघटनांकडून करण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या छाननीनंतर पात्र ठरलेल्या २२५ अर्जदारांमधून अंतिम ४५ नावांची निवड कोणत्या निकषांवर होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय पात्र अर्जदार

  • औंध- बाणेर - १८

  • कसबा पेठ -११

  • कोंढवा-उंड्री - १९

  • कोथरूड-बावधन - १२

  • छत्रपती शिवाजीनगर-घोले रस्ता - १४

  • ढोले पाटील रस्ता - १४

  • धनकवडी-कात्रज-आंबेगाव - २२

  • नगर रस्ता-वाघोली - ४

  • बिबवेवाडी - १३

  • येरवडा-वडगावशेरी - १२

  • वानवडी - ६

  • वारजे-कर्वेनगर -१९

  • विश्रामबागवाडा - १४

  • सिंहगड रस्ता - २०

  • हडपसर-मांजरी- २७

  • एकूण - २२५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news