पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या 'या' एक्सप्रेस गाड्या २८ ते ३० जूनपर्यंत रद्द

पुणे-मुंबई दरम्यानच्या एक्सप्रेस गाड्या तीन दिवसांसाठी रद्द
Pune Railway Station
पुणे- मुंबई दरम्यान काही एक्सप्रेस गाड्या २८ ते ३० जूनपर्यंत धावणार नाहीतPudhari News Network

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

Pune Railway Station
हज यात्रेदरम्यान 98 भारतीयांचा मृत्यू

‘या’ गाड्या होणार रद्द

शुक्रवार २८ जूनला पुणे-मुंबई इंटरसिटी/एक्सप्रेस रद्द राहणार आहे. शनिवारी २९ जूनला मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहे. तर त्याच दिवशी पुणे मुंबई इंटरसिटी सुद्धा रद्द राहणार आहे. तसेच, रविवारी ३० जून रोजी मुंबई-पुणे इंटरसिटी रद्द राहणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना या तीन दिवशी पुणे मुंबई प्रवासासाठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news