

Defense minister Rajnath Singh on Operation Sindoor
नवी दिल्ली: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सूड म्हणून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतूक केले. हे कौतूक करताना त्यांना प्रभू हनुमानाचे शब्द आठवले.
राजनाथ सिंह म्हणाले की, "ही कारवाई केवळ आपली लष्करी अचूकता दर्शवत नाही, तर आपली नैतिक संयमताही दर्शवते. प्रभू हनुमानाच्या शब्दात सांगायचं तर: ‘जिन मोहि मारा, तिन मोहि मारे’. याचा अर्थ, आम्ही फक्त त्यांनाच लक्ष्य केले ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारले," असे त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्लीमध्ये बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने सुरु केलेल्या 50 नव्या पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. सिंह भारतीय सशस्त्र दलांचे कौतुक केले.
भारतीय सशस्त्र दलांचे गौरव करताना राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले की या कारवाईत अशा दहशतवाद्यांचा नायनाट करण्यात आला ज्यांनी निष्पाप नागरिकांवर हल्ला केला होता.
निर्दोषांना मारणाऱ्यांवर भारतीय लष्कराने प्रहार केला. हे ऑपरेशन म्हणजे दहशतवाद्यांवर घातलेला अचूक घाव आहे.
पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या अधिकृत नियंत्रणाखालील काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर करण्यात आलेल्या अचूक हल्ल्यांविषयी ते म्हणाले, "तुम्हा सर्वांना माहीत आहे, काल रात्री भारतीय सशस्त्र दलांनी पराक्रम आणि शौर्य दाखवत इतिहास घडवला.
त्यांनी अचूकतेने, सतर्कतेने आणि संवेदनशीलतेने काम केलं. आपल्याकडून ठरवलेल्या सर्व लक्ष्यांचा नायनाट नियोजित योजनेप्रमाणे करण्यात आला."
ही कारवाई जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर झाली, ज्यात 26 पर्यटक आणि एक स्थानिक तट्टूचालक ठार झाले.
सिंह यांनी सांगितले की, या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचे संबंध सीमेपलीकडे होते आणि तपासात पूर्वीच्या भारतावरील हल्ल्यांप्रमाणेच या हल्ल्यातही पाकिस्तानचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
ते म्हणाले, "म्हणजेच, लष्कराने ज्या प्रकारे अचूकता, खबरदारी आणि करुणा दाखवली आहे, त्यासाठी मी संपूर्ण देशाच्या वतीने आमच्या जवानांचे आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो."
संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, भारताने दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरला आहे.
बुधवार, 7 मेच्या पहाटे भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले.
या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कवर मोठा आघात झाला.
भारताच्या या कारवाईदरम्यान दहशतवादी मसूद अझहर अनेक निकटवर्तीय, त्यामध्ये त्याचे दहा नातेवाईकही असल्याचे वृत्त आहे, ठार झाले. दरम्यान, पाकिस्तानने भारताने निवळते करार मान्य केल्यास तणाव कमी करण्याची तयारी दर्शवली आहे.