Pimpri Metro News : महामेट्रोला पावले गणपती बाप्पा; 4 लाखाहून अधिक जणांनी केला प्रवास

Pimpri Metro News : महामेट्रोला पावले गणपती बाप्पा;  4 लाखाहून अधिक जणांनी केला प्रवास

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील गणपती देखावे पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी मेट्रोला मोठी पसंती दिली. तब्बल 4 लाख 5 हजार 280 जणांनी गणेशोत्सवातील दहा दिवसांत मेट्रोने प्रवास करीत गणरायांचे दर्शन घेतले. त्यातून महामेट्रोला 63 लाख 23 हजार 718 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या काळात मेट्रोची वेळ वाढविण्यात आली होती. ऑगस्टच्या एका महिन्यात एकूण प्रवास 21 लाख 16 हजार 772 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यातून 3 कोटी 25 लाख 88 हजार 900 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर, सप्टेंबर महिन्यात (28 तारखेपर्यंत) 19 लाख 13 हजार 227 नागरिकांनी प्रवास केला. त्यातून 2 कोटी 81 लाख 89 हजार 760 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

ऑगस्ट महिन्यात 15 तारखेला सर्वात जास्त 1 लाख 69 हजार 512 नागरिकांनी प्रवास केला. तर 30 लाख 63 हजार 350 रुपयांचे उत्पन्न मिळाले. सप्टेंबर महिन्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी (दि.28) सर्वात जास्त 1 लाख 63 हजार 227 नागरिकांनी प्रवास केला. तर, 25 लाख 48 हजार 384 रुपयांचे उत्पन्न मिळाले. एक ऑगस्टपासून मेट्रो पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते रुबी हॉल क्लिनिक आणि वनाजपर्यंत धावत आहे.

त्या दिवसापासून आतापर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका भवन स्टेशन ते सिव्हिल कोर्ट स्टेशन या मार्गावर 16 लाख 89 हजार 858 जणांनी प्रवास केला. त्यातून 2 कोटी 67 लाख 44 हजार 304 रुपयांचे उत्पन्न मिळाले. वनाज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन मार्गावर 22 लाख 74 हजार 197 नागरिकांनी प्रवास केला. त्या माध्यमातून एकूण 3 कोटी 22 लाख 42 हजार 665 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news