

पुणे : पुण्यात भारतीय जनता पक्षाने ५.५० लक्ष सदस्य नोंदणी केली असून येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मंगळवारी (दि.१३) व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि १३) राज्यातील ५८ जिल्हाध्यक्षांची निवड केली. यात पुणे शराध्यक्षपदी धिरज घाटे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. या निवडीनंतर घाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, पक्षाने मला परत संधी देऊन जो विश्वास दाखवला, तो सार्थ करून पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे घाटे यांनी आभार मानले.