Pune Market Yard Power Cut: विजेच्या लपंडावाने मार्केट यार्डातील वजनकाटे, बिलिंग ठप्प

पुणे मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, संगणकीय बिलिंग आणि जीएसटीच्या कामकाजात अडथळे येत आहेत.
Market Yard Vegetable
Market Yard VegetablePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात खरेदी-विक्रीची लगबग वाढली असतानाच गूळ-भुसार विभागातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. विजेच्या लपंडावामुळे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, संगणकीय बिलिंग आणि जीएसटीसंबंधित कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, व्यापाऱ्यांसह ग्राहक, पुरवठादार आणि वाहतूकदारांचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे.

Market Yard Vegetable
MPSC Protest Pune: सातव्या दिवशीही एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच!

मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात दररोज मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक-जावक आणि आर्थिक व्यवहार होतात. बहुतांश व्यवहार संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अवलंबून आहेत.

Market Yard Vegetable
MPSC Protest Pune: एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाही; जागा सोडण्याच्या पोलिसांच्या सूचना

मात्र, गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होत असल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वीज गेल्यानंतर मालाचे वजन, बिलिंग आणि मालाची आवक-जावक प्रक्रिया रखडत आहे. सणासुदीच्या काळात व्यवहार वाढलेले असताना वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे व्यापारवर्गाकडून सांगण्यात आल आहे.

सणासुदीच्या काळात मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महावितरण आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला चेंबरच्या वतीने पत्र देण्यात आले आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गूळ-भुसार विभागात अखंडित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.

- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स‌ चेंबर

मार्केट यार्डातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना वेग आला आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बंद पडत असून, बिलिंगसह दैनंदिन व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांचीही गैरसोय होत आहे.

- राजेंद्र गुगळे, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स‌ चेंबर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news