Pune Municipal Corporation Election: पुणे महापालिका निवडणूक : सत्तेचा फैसला आज

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत, निकालाकडे पुणेकरांचे लक्ष
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 15) मतदान होत आहे. या निवडणुकीत महापालिकेच्या कारभाराची कोणाला संधी द्यायची आणि कोणाला घरी बसवायचे यासंबंधीचा निर्णय पुणेकर मतदानातून घेणार आहेत. भाजपला पुन्हा बहुमताने स्वीकारणार, की राष्ट्रवादी काँग््रेास कमबॅक करणार आणि विरोधकांची अवस्था नक्की कशी असणार हे ठरविणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे नक्की कोणावर संक्रांत ओढवणार याबाबत उत्सुकता आहे.

Pune Municipal Corporation
Gopinath Munde Farmer Accident Scheme: पुणे जिल्ह्यात 110 शेतकरी कुटुंबांना गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेना आणि काँग््रेास, शिवसेना ठाकरे पक्ष, मनसे यांची एकत्रित महाविकास आघाडी यांची चौरंगी लढत आहे. यामध्ये भाजपने सर्वच्या सर्व 165 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामधील दोन जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग््रेास 139 आणि राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष 34, शिवसेना 128 तसेच महाविकास आघाडीत काँग््रेास 92, शिवसेना ठाकरे 62 आणि मनसे 44 याशिवाय आप 81 तसेच अपक्ष 276 असे एकूण सर्व 1 हजार 153 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीत राज्यात महायुतीत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास यांच्यातच खऱ्या अर्थाने निवडणुकीचा सामना रंगला.

Pune Municipal Corporation
Baramati Jilha Parishad Panchayat Samiti Election: बारामतीत जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

या निवडणुकीत भाजपने थेट 125 जागा जिंकू, अशी गर्जना केली होती. त्यातच राष्ट्रवादीने दिलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारावरून भाजपने राष्ट्रवादीला टार्गेट करून अडचणीत आणण्याचे काम केले. त्याला भाजपच्या टीकेला आक्रमक पद्धतीने उत्तर देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढल्याचे चित्र दिसून आले. त्यातच पुणेकरांना मेट्रो, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 54 कि.मी.ची भुयारी मार्ग अशा प्रकल्पांच्या माध्यमातून भाजपाने मतदारांना हाक दिली, तर थेट मोफत पीएमपी व मेट्रो बससेवा आणि पाचशे चौरस फुटांखालील घरांना मिळकतकर माफी अशी घोषणा करीत राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा चेकमेट करण्याचे काम केले, तर काँग््रेासचा काळ, सुवर्णकाळ अशी आठवण करीत काँग््रेासने मतदारांना आवाहन केले. मात्र, राष्ट्रवादीच्या पीएमपी व मेट्रोच्या घोषणेने भाजपसह सर्वच पक्षांची फरपट झाली.

Pune Municipal Corporation
Daund Crime: दौंड पोलीस ठाण्यासमोरच कोयत्याने प्राणघातक हल्ला

प्रचाराच्या शेवटच्या टप्यात देवेंद्र फडणवीस यांची झालेली जाहीर मुलाखत चर्चेची ठरली, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीच प्रचार रॅली आणि सभेच्या माध्यमातून एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅलीसह झालेल्या दोन सभा घेऊन त्यांच्या उमेदवारांना ताकद देण्याचे काम केले, तर काँग््रेासकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, निरीक्षक सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुण्यातील काँग््रेासच्या प्रचाराचे मैदान सांभाळले. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, तर मनसेच्या उमेदवारांना मात्र राज ठाकरे यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशीच्या गाठीभेटीच्या पलीकडे फारशी साथ मिळाली नाही.

Pune Municipal Corporation
Daund Diesel Theft Highway: यवत परिसरात महामार्गावर उभ्या ट्रकमधून 810 लिटर डिझेलची चोरी

क्रॉस मतदानामुळे इच्छुकही धास्तावलेले

या निवडणुकीत चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने क्रॉस व्होटिंग (मतदान) होण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुक धास्तावलेले आहेत. मतदानापूर्वीच अनेक प्रभागांमध्ये एकमेकांच्या विरोधात पॅनेलमध्ये उभे असलेल्या उमेदवारांमध्ये संगनमत झाल्याची चर्चा झाली. त्याचा फटका ही काही प्रबळ उमेदवारांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news