

पुणे: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग््राह अनुदान योजना 2025-26 मध्ये दिनांक 31 डिसेंबर 2025 अखेर पुणे जिल्ह्यात अंतिमतः मंजूर झालेल्या 110 प्रस्तावांना 2 कोटी 17 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 107 आणि अपंगत्व आलेल्या 3 शेतकऱ्यांच्या प्रस्तावांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग््राह योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, विंचूदंशमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात.
तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीला तसेच त्याच्या कुटुंबांतील सदस्याला झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
अशा अपघातग््रास्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकरी पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वयोगटातील 2 जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग््राह योजनेतून लाभ देण्यात येतो.
पुणे जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व आलेले आहे. त्यात इंदापूर 1, खेड 1 आणि पुरंदरमधील 1 मिळून तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. जुन्नर तालुक्यात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 19 असल्याचेही काचोळे यांनी सांगितले.