

Pune Police Action Against Goons
पुणे : लोणी काळभोर, बिबवेवाडी, तसेच हडपसरमधील फुरसुंगी परिसरात गंभीर गुन्हे करणार्या नऊ सराईतांना परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले.
प्रेमलता मुकेश करमावत (वय 45, रा. मंतरवाडी, फुरसुंगी), पंकज मुकेश करमावत (वय 25, रा. उत्तमनगर), मनोज रतन गुमाणे (वय 50, रा. भीमनगर, मुंढवा), शेख अहमद ऊर्फ बबलू सूरज सय्यद (वय 19, रा. सुखसागनरनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सागर संदीप गुडेकर (वय 24, रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर), जाफर शाजमान इराणी (वय 43, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर), मजलूम हाजी सय्यद (वय 48, पठारेवस्ती, लोणी काळभोर), शब्बीर जावेद जाफरी (वय 38, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर), शाजमान हाजी इराणी (वय 62, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
करमावत, गुमाणे यांच्याविरुद्ध गावठी दारू विक्री, बबलू सय्यद विरद्ध खुनाचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणे, तर गुडेकरविरुद्ध खून, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, इराणी टोळीविरुद्ध फसवणूक, चोरी करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव लोणी काळभोर, मुंढवा, कोंढवा पोलिसांनी तयार केला होता. हा प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. संबंधित प्रस्ताव मंजूर करून पोलिस उपायुक्त शिंदे यांनी करमावत, गुमाणे, गुडेकर, इराणी, सय्यद, जाफरी यांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.
परिमंडळ पाचमधील 11 टोळ्यांमधील 76 गुंडाविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली आहे. तसेच, 20 गुंडांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली आहे. 41 सराइतांना तडीपार केले असून, एकूण मिळून 137 सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तडीपार गुंड शहरात आढळून आल्यास त्वरित परिमंडळ पाच पोलिस उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.