ओतूर : येथील जमिनीच्या वादातून घोडेगाव येथील मावलया डोंगरावर नेऊन त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निखिल संदीप घोलप (वय २०, रा. वाटथळ, ता. जुन्नर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर अभिषेक प्रकाश घोलप, जितेंद्र पांडुरंग घोलप(दोघेही रा. वाटखळे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
वाटखळ (ता. जुन्नर) येथील निखिल घोलप हे १ ऑगस्ट रोजी हरवल्याची फिर्याद ओतूर पोलिसांत दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. घोडेगाव येथील मावलया डोंगरावर सोमवारी (दि.१९) त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांकडून निखीलच्या खूनाचा शोध सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारे हवालदार भारती भवारी व पोलिस नाईक नदीम तडवी यांनी अभिषेक घोलप, जितेंद्र घोलप या दोघांना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खूनाची कबूली दिली.