Nashik Murder | संपत्तीसाठी गतिमंद भावाचा खून, चौघांवर गुन्हा दाखल

मृताच्या चुलत भावाचा काकूसह चौघांविरोधात आरोप
Nashik Murder
संपत्तीसाठी गतिमंद भावाचा खूनFile Photo
Published on
Updated on

नाशिक (Nashik Murder) : संपत्ती बळकावण्यासाठी काकू व इतर तिघा नातलगांनी मिळून गतिमंद चुलत भावावर टोकदार शस्त्राने दुखापत करीत खून केल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. संशयितांनी पोलिस व डॉक्टरांची दिशाभूल करून भावाचा अपघाती मृत्यू असल्याचे भासवले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शिंगाडा तलाव येथील सेठी कंपाउंड परिसरात ७ जुलै रोजी ही घटना घडली.

अभिजितसिंग जतिंदरसिंग गुजराल (३९, रा. तिडके कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मंजीतकौर चढ्ढा, तेजकिरतसिंग चढ्ढा (दोघे रा. सेठी कपाउंड, शिंगाडा तलावाजवळ), शरणसिंग गिल (रा. द्वारका) व करणसिंग गिल (रा. कमोदनगर) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुजराल यांचे काका जसपालसिंग चढ्ढा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात स्थावर-जंगम मालमत्तेचे वाटप केले होते. त्यानंतर गतिमंद असलेल्या गुरुपाल राजा याच्या हिस्याची संपत्ती हडपण्यासाठी चारही संशयितांनी संगनमत करून त्यास उपाशी पोटी ठेवून मारहाण करीत घरात डांबून ठेवले. तसेच ७ जुलैला त्यास टोच्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने अंगावर ओरखडल्याच्या जखमा करून त्याचा खून केला. त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो गतिमंद असल्याने त्याने स्वत:च हत्याराने स्वत:वर वार करून दुखापत केली. तसेच पलंगावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना व रुग्णालयास दिल्याचा दावा अभिजित गुजराल यांनी फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत.

Nashik Murder
Nashik Crime Update | दंगलीतील २२ संशयितांना न्यायालयीन कोठडी

काकांनी केलेले संपत्तीचे वाटप (Nashik Murder)

काका जसपालसिंग चढ्ढा यांनी २०२० मध्ये संपत्तीचे वाटप केले. त्यात त्यांचा मुलगा तेजकिरतसिंग चढ्ढा याला संपत्तीचा ५० टक्के वाटा, मुलगी अस्मितकौर हिला २० टक्के वाटा, अभिजितसिंग यास २० टक्के व पुतण्या गुरुपालसिंग सेठी ऊर्फ गुरुपाल राजा यास १० टक्के वाटा दिला आहे. तसेच काकांच्या मृत्युपत्रानुसार गुरुपाल राजा हा गतिमंद असल्याने त्याच्यासह तेजकिरत चड्डा, अस्मितकौर चढ्ढा यांच्या पालन पोषणाची जबाबदारी अभिजित गुजराल यांच्यावर सोपवली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news