Pune Kerosene Stove Shortage: पुण्यात रॉकेल मिळणार, पण स्टोव्ह कुठे?; ई-शेगड्यांकडे वाढता कल

बाजारातून स्टोव्ह गायब; नागरिक इलेक्ट्रिक पर्यायांकडे वळले, गॅसपुरवठा नियमित करण्याची मागणी
Kerosene
KerosenePudhari
Published on
Updated on

पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून रॉकेल मिळत नसल्याने अनेकांच्या घरातील स्टोव्ह गायब झाले असून, बाजारपेठेतूनही स्टोव्ह विक्री बंद झाल्याचे चित्र बुधवारी (दि. 18) पाहायला मिळाले. त्यामुळे रॉकेल देताय धन्यवाद; पण वापरायचे कसे? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

Kerosene
Pune Mayor Chashak: पुण्यात महापौर चषक व परीक्षा एकाच वेळी; खेळाडू-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

गॅसपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून केरोसिन (रॉकेल) पुरवठा साखळी सुरळीत करण्याचे संकेत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत दिले. मात्र, शासनाच्या या निर्णयावर पुणेकरांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Kerosene
Pune DP Roads Delay: पुण्यात डीपी रस्त्यांची रखडलेली कामे; वाहतूक कोंडीवरून सभागृहात संताप

या पार्श्वभूमीवर दै. ‌‘पुढारी‌’ने पुण्यातील बाजारपेठेची पाहणी केली असता, हे चित्र समोर आले. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आता स्टोव्ह विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले, ते म्हणाले, आता रॉकेलपुरवठा थांबल्यामुळे दुकानदारांनी स्टोव्ह आणि त्याचे सुटे भाग ठेवणेही बंद केले आहे. याव्यतिरिक्त दुकानदार आता ई-शेगड्या विकण्यावर भर देत आहेत, असेही ते म्हणाले.

Kerosene
Pune Stray Dogs Menace: पुण्यात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; महापालिकेत संतापाची लाट

पूर्वी रॉकेल सहज मिळायचे, त्यामुळे घरोघरी स्टोव्ह असायचे. मात्र, आता रॉकेलच उपलब्ध नसल्याने स्टोव्हची विक्री बंद आहे. सध्या संपूर्ण पुणेकरांना उपलब्ध होतील, इतके स्टोव्ह मार्केटमध्ये नाहीत. ग््रााहक आता इलेक्ट्रिक शेगड्यांकडे वळले आहेत. मध्यंतरी युद्धजन्य परिस्थितीमुळे ई-शेगड्यांचा तुटवडा होता. मात्र, आता पुरवठा सुरळीत झाला असून, आम्ही ग््रााहकांसाठी जास्तीत जास्त शेगड्या उपलब्ध करत आहोत.

नितीन काकड, उपाध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ तथा ई-शेगडी विक्रेते

Kerosene
Asawari Jagdale Pune: पहलगाम हल्ल्यानंतर वर्षभराने न्याय; आसावरी जगदाळे यांची महापालिकेत नियुक्ती, पद कोणते?

गॅस सिलिंडर संपला की, पूर्वी स्टोव्ह हाच मोठा आधार असायचा. पण आता कित्येक वर्षांपासून घरात स्टोव्ह नाही आणि तो जुना स्टोव्ह दुरुस्त करणारे कारागीरही मिळत नाहीत. सरकारने रॉकेल उपलब्ध करून दिले तरी त्यासाठी नवीन स्टोव्ह कोठून आणायचा? त्यापेक्षा गॅसपुरवठा नियमित कसा राहील, याकडे सरकारने लक्ष द्यावे.

सुरेखा शिंदे, गृहिणी, नऱ्हेगाव रहिवासी

अचानक रॉकेल संस्कृतीकडे परतणे आता कठीण आहे. आजच्या काळात कोणाकडेही स्टोव्ह शिल्लक नाहीत. रॉकेलचा धूर आणि वास यामुळे आताच्या पिढीला ते वापरणे खूपच त्रासदायक ठरेल. शासनाने रॉकेल वाटपाचा विचार करण्यापेक्षा सौर ऊर्जा किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांसाठी काही सवलती दिल्या, तर ते जास्त सोयीचे होईल.

अमित कड, नोकरदार, वाघोली रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news