Pune Kamala Nehru Hospital: कमला नेहरू रुग्णालयात शस्त्रक्रिया दीडपट वाढ

सुधारित सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांमुळे रुग्णसंख्या वाढली; आरोग्यसेवेवर नागरिकांचा वाढता विश्वास
Operations
OperationsPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात निधी, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि अद्ययावत सुविधांमुळे आरोग्यसेवेचा दर्जा उंचावला आहे. परिणामी, रुग्णांना दुसरीकडे पाठविण्याचे प्रमाण घटले असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांत शस्त्रक्रियांची संख्या तब्बल दीडपट वाढल्याचे समोर आले आहे.

Operations
Pune Hapus Mango Price: पुण्यात हापूस आंबा महागच; अक्षय्य तृतीयेलाही दर कमी नाहीत

महापालिकेच्या मंगळवार पेठेतील 300 खाटांच्या कमला नेहरू रुग्णालयाने अलीकडच्या काळात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. रुग्णालयात 24 तास तातडीच्या सेवा उपलब्ध असून, विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढली आहे. यामध्ये अस्थिव्यंगोपचार, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, सर्वसाधारण वैद्यक, भूलतज्ज्ञ तसेच मानसोपचार या विभागांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी हे रुग्णालय अधिक विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.

Operations
Pune Heatwave Temperature: पुण्यात उष्णतेची लाट; लोहगावचा पारा 41 अंशांवर

महापालिकेकडून सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली. यामध्ये 100 खाटांची वाढ, 25 नवीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, अतिदक्षता विभागाचे नूतनीकरण, शस्त्रक्रिया कक्षांचे सक्षमीकरण, सौरऊर्जा प्रणाली तसेच रुग्ण व नातेवाईकांसाठी सोयीसुविधा यांचा समावेश आहे. या सुधारणांचा थेट परिणाम रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर झाला आहे.

Operations
Pune Shelter Bangladeshi Women Escape : रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 बांगलादेशी महिलांचे पलायन

मागील तीन महिन्यांत 1,952 शस्त्रक्रिया

ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत बालरोग विभागातील 19 रुग्णांना बाहेर पाठवावे लागले होते, तर जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान ही संख्या 9 वर आली आहे. तातडीच्या कक्षातील रेफरल 380 वरून 313 वर, तर स्त्रीरोग विभागातील रेफरल 175 वरून 131 वर घसरले आहे. शस्त्रक्रियांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत 1486 शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तर जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत ही संख्या वाढून 1952 वर पोहोचली आहे.

Operations
Superstitions History : शत्रुत्व असणाऱ्या व्यक्तीवर भूत सोडले जाई?

अद्ययावत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. नागरिकांचा रुग्णालयावरील विश्वास अधिक बळकट होत असून, कमला नेहरू रुग्णालय शहरातील सक्षम व विश्वासार्ह आरोग्य केंद्र म्हणून विकसित होत आहे.

डॉ. प्रशांत बोठे, वैद्यकीय अधीक्षक, कमला नेहरू रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news