Superstitions History : शत्रुत्व असणाऱ्या व्यक्तीवर भूत सोडले जाई?

तक्रारींची नोंद सरकार दफ्तरी घेतली जात असे; अंधश्रद्धेमागे दडले होते अर्थकारण
Superstitions History
Superstitions History
Published on
Updated on

पुणे ः अठराव्या शतकात अंधश्रद्धेचा फायदा घेत एखाद्याच्या अंगावर भूत सोडणे वगैरे असे भंपक प्रकार त्या काळात सर्रास चालत असत. अशा नोंदी पुरालेखागरातील मोडी कागदपत्रांत सापडतात. अंधश्रद्धेमागे मोठे अर्थकारणही कसे दडलेले होते हेच दिसून येते.

त्या काळात भुते-खेते हे कथित प्रकार असले तरी या घटना, घडामोडी हा तत्कालीन समाजजीवनाचा अविभाज्य भाग होता. या प्रकारांना त्या काळात सामाजिक व राजकीय मान्यता होती. हेच पत्रव्यवहारावरून दिसते. एखाद्यावर भुते सोडणे हा प्रकार अगदीच सहज आणि सर्वमान्य होता. भूत-पिशाच्च, करणीबाधा अशा भुतिक उपद्रवाविषयीच्या अनेक तक्रारी सर्रासपणे प्रांत कचेरीत येत असत. त्याचा निवाडाही तिथे होत असे. मोडी कागदपत्रांतून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर भुते सोडली, भुतिक उपद्रव केला करणीबाधा केली, मूठ मारली अशा हजारो नोंदी सापडतात.

तत्कालीन मोडी कागदपत्रांतील हे दाखले

‌‘प्रांत राजपुरी येथील मामले तळे येथे नागा नावाच्या व्यक्तीची भुते गावात पडोन गावकरी यांचा नाश होऊ लागला.‌’ (इसवी सन 1797 ते 98).

‌‘देवगड तालुक्यातील गंगाजी नामक इसमाने गोविंद हरी तुळपुळे याजवर भुते घातली‌’ (इसवी सन 1801 ते 1802).

...असे होते भुते काढण्याचे दर (इसवी 1759-60)

  • त्या कालखंडात भुते काढणे हा एक व्यवसायच होता, हे पुढील नोंदीवरून स्पष्ट होते. ‌

  • ‘सुवर्णदुर्ग तालुक्यातील तर्फ खेडमधील मौजे करटले या गावातील भुतांचा उपद्रव दूर करण्यासाठी सरकारातून भूतवैद्य नेमून दिला होता. त्याने गावातील एकूण 7 भुतांचा उपद्रव दूर केला. त्यासाठी प्रतिभूत, दीड रुपया मजुरी त्याने घेतली.‌’

  • ‘मल्हारजी जागडा याच्याकडे उपद्रव देणारी 5 भुते व संभाजी जामकर याच्याकडे उपद्रव देणारी 4 भुते अशा एकूण 9 भुतांचे साडेतेरा रुपये मजुरी म्हणून घेतले गेले.‌’

  • भूतवैद्यांकडून भूतफरोसी घेतल्याचे दाखले दिसतात. (इसवी सन 1762-63) भूतफरोसी म्हणजे भूतवैद्यांकडून सरकारात जमा होणारा एखादा कर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news