Pune Jeweller Fraud: पुण्यात सराफ व्यावसायिकांची सव्वातीन कोटींची फसवणूक; कोरेगाव पार्क पोलिसांची कारवाई

सोने, चांदी व रोकड घेऊन फसवणूक; मुख्य आरोपी अटकेत, इतरांचा शोध सुरू
Gold-Silver
Gold-SilverPudhari
Published on
Updated on

पुणे: सोने, चांदी आणि रोकड घेऊन सराफ व्यावसायिकांची सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Gold-Silver
Sodium Battery : देशातील पहिली सोडियम बॅटरी तयार; पहिल्या टप्यात दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी उपलब्ध होणार

याबाबत संजय पुष्कराज राठोड (वय 55, रा. सुजय गार्डन, मुंकुदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमन कोरीमुथा (वय 27, रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) याला अटक केली आहे, तर पंकज जैन (कोरीमुथा), नेमीचंद कोरीमुथा आणि प्रणव कोरीमुथा (रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 22 जानेवारी 2026 रोजी बंडगार्डन रोडवरील राठोड ज्वेलर्स येथे घडला आहे.

Gold-Silver
Land Record Maharashtra: राज्यातील भूखंडांना मिळणार भूआधार क्रमांक; सातबारा उतारा अद्ययावत होणार

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी संजय राठोड यांचे बंडगार्डन रोडवर राठोड ज्वेलर्स हे दुकान आहे. पंकज जैन, नेमीचंद कोरीमुथा हे नवकार ज्वेलर्स व श्री नवकार प्लस या ज्वेलर्सचे मालक आहेत. दोघेही सराफ व्यावसायिक असून, एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे आहेत. राठोड यांनी नवीन माल घेण्यासाठी त्यांना 60 किलो चांदी दिली होती.

Gold-Silver
Ajit Pawar Sunetra Pawar: अजित पवार–सुनेत्रा पवार : राजकारणाच्या पलीकडचा 37 वर्षांचा विश्वासाचा संसार

ते नवीन माल दोन ते तीन दिवसांत देणार होते. मात्र, त्यांनी दोन -तीन दिवसांचा वायदा केल्यानंतरही नवीन वस्तू बनवून दिल्या नाहीत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा त्यांनी इतर व्यावसायिक मित्रांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांना समजले की, हरी विजय बाळकृष्ण देवकर यांच्याकडून त्यांनी 98 लाखांचे सोने घेतले आहे.

Gold-Silver
Baramati Aircraft Crash Safety: बारामती विमान अपघात: खासगी चार्टर विमान सुरक्षेवर तज्ज्ञांनी उपस्थित केले प्रश्न

तसेच उमेश दराडे यांच्याकडून 50 किलो चांदी देण्याचा वायदा करून त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेतल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राठोड यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी हा व्यवहार पाहणारा त्यांचा पुतण्या अमर कोरीमुथा याला अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news