पुणे : ३ हजार ६७४ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबीकडे वर्ग

File photo
File photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा पुण्यातील कुरकुंभ कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केले आहे. यातून तब्बल 3 हजार 674 कोटी रूपयांचे तब्बल 1 हजार 836 किलो मेफेड्रॉन जप्त केले होते. या गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवरील असल्याने गुन्ह्याचा तपास आता पुणे पोलिसांकडून नार्कोटीक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) कडे वर्ग करण्यात आला आहे. दि. 10 जून रोजी कागदपत्रांसह हा तपास सूपूर्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

या प्रकरणात वैभव उर्फ पिंट्या माने, अयज आमरनाथ करोसिया, हैदर नुर शेख, कुरकुंभ येथील अर्थकेम लॅब्रोटरीजचा मालक भिमाजी परशुराम साबळे, ड्रग्ज बनविण्यात माहिर असलेला युवराज बब्रुवान भुजबळ, आयुब मकानदार यांना अटक करण्यात आली होती. तर पुढे सुनील बर्मन, अशोक मंडल, शोएब शेख, पप्पु कुरेशी, अली शेख, सॅम उर्फ ब्राउन आणि मास्टर माईंड संदीप धुनिया यांच्यावरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावल्यानंतर समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून गुन्हे शाखेने मेफेड्रॉन विक्रेत्या वैभव मानेला अटक केली होती. त्याच्यासह त्याच्या साथीदारांकडून एक कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर हे ड्रग्ज त्याला विश्रांतवाडी येथील हैदर शेखने दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हैदरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी 105 कोटींचे तब्बल 52 किलो 520 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. पुढे त्याच लिंकचा आधार घेत पोलिसांना कुरकुंभ येथील अर्थकेम कारखाना गाठला. या ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल 1 हजार 327 कोटींचे सुमारे 60 लाखांचे 663 किलो 800 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. हे सर्व मेफेड्रॉन कुरकुंभ येथील अर्थकेम कारखान्यातूनच तस्करी होत असल्याचे तपासात समोर आले. याच कारखान्यातून हे ड्रग्ज दिल्ली तसेच इतर राज्यात वितरीत होत असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले होते.

येथीलच ड्रग्ज पुढे आंतराष्ट्रीय बाजारात म्हणजे विमानाद्वारे लंडनला देखील गेल्याचे निष्पन्न झाले होते. पुणे पोलिसांनी सांगली आणि दिल्ली येथील गोदामामधूनही मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केले. यामध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणार्‍या संदीप धुनिया उर्फ धुणेचे नाव पुढे आले होते. तोच या ड्रग्ज प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत याप्रकरणात 1 हजार 836 किलो मेफेड्रॉन पकडण्यात आले आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 3 हजार 674 कोटी 35 लाख 30 हजार इतकी आहे. या तपासावर सुरवातीपासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणा एनसीबी, एनआय लक्ष ठेऊन होती. या प्रकरणाची लिंक आंतराष्ट्रीय पातळीवर जात असल्याने व याची दहशतवादी कारवाईशी काही लिंक आहे का ? या दृष्टीने तपासात स्थानिक येणार्‍या मर्यादा पाहता हा तपास आता पुणे पोलिसांकडून काढून एनसीबीडे देण्यात आला आहे.

गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याच्यासह साथीदारांचा शोध सुरू आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपींच्या टोळीने मुख्यत्वे हैदर शेख याने पप्पु कुरेशीला पुणे, महाराष्ट्रात तसेच दिल्ली येथे मेफेड्रॉन तस्करी करण्यासाठी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पप्पु कुरेशी हा सातत्याने संदिप धुणे उर्फ धुनिया, शोएब शेख यांच्या संपर्कात होता. त्याने आरोपींच्या मदतीने पुण्यात गोदाम भाडेतत्वावर घेतले होते. तेथे मेफेड्रॉन सापडले होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news