Gas Shortage Pune: गॅस टंचाईचा फटका; पुण्यात हॉटेल व्यवसायावर संकटाचे सावट

आखाती युद्धाचा परिणाम; कोळसा-इलेक्ट्रिकवर स्वयंपाक, परिस्थिती न सुधारल्यास हॉटेल बंद होण्याची भीती
Hotel Gas Shortage
Hotel Gas ShortagePudhari
Published on
Updated on

पुणे : आखातात भडकलेल्या युद्धामुळे गॅसचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील बहुतांश हॉटेल आणि रेस्टॉरंटचालकांनी स्वयंपाकासाठी कोळसा, इंडक्शन आणि अन्य इलेक्ट्रीक उपकरणांचा पर्याय स्वीकारला. एरवी दररोज चार सिलिंडर वापरणाऱ्या काही हॉटेलांना आता कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तो अपुरा असून, येत्या काळात परिस्थिती पूर्ववत न झाल्यास शहरातील हॉटेल तसेच रेस्टॉरंट व्यवसाय बंद होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

Hotel Gas Shortage
Pune Women Bike Rally: नारीशक्तीचा जल्लोष! पुण्यात उद्या भव्य महिला बाईक रॅली

पूना हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास चाफळकर म्हणाले, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्यानंतर बहुतांश हॉटेल आणि रेस्टॉरंटचालकांनी चार ते पाच दिवसांसाठी बंद ठेवले होते. मात्र, त्यानंतर कोळसा शेगडी, इंडक्शन तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणांकडे वळत पुन्हा व्यवसाय सुरू केला. सध्या बहुतांश हॉटेलचालकांनी त्यांच्या मेन्यूकार्डमधील पदार्थ कमी केले आहेत. यामध्ये ज्या खाद्यपदार्थांना जास्त गॅस लागतो ते विशेषत: बंद केले आहेत. गॅसचा तुटवडा असल्याने खाद्यपदार्थ पुरवू शकत नसल्याचे चित्र आहे. यामध्ये हॉटेल तसेच रेस्टॉरंट क्षेत्राला सर्वाधिक फटका बसत आहे.

Hotel Gas Shortage
QS Ranking Indian Universities: क्यूएस क्रमवारीत भारतीय शिक्षणाचा झेंडा; सहा नामांकित संस्थांची दमदार एन्ट्री

टपरीचालक, बँक्वेट यापेक्षा हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये गॅसची मागणी सर्वात जास्त असते. तर, खाद्यपदार्थांमध्ये पंजाबी खाद्यपदार्थांची फ्रेश ग्रेव्ही तयार करण्यासाठी गॅस लागतो. मात्र, तो नसल्यामुळे सध्या हॉटेलमध्ये प्रीपॅकेज ग्रेव्हीवर काम सुरू आहे. बहुतांश खाद्यपदार्थांना हायफ्लेम गॅस लागतो. परंतु, तो व्यवस्थित नसल्यामुळे त्याचा धंद्यावरही परिणाम झाला आहे. पुरवठादारांकडे शासनाकडून जसा पुरवठा होतो, तसा हॉटेलचालक विकत घेत आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी एक ते दोन सिलिंडरवर सर्व कामकाज सुरू आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे. ही परिस्थिती पुढील आठवडाभर लांबल्यास शहरातील रेस्टाँरट हळूहळू बंद पडू लागतील, असेही चाफळकर यांनी नमूद केले.

Hotel Gas Shortage
Pune EV Tax Exemption: ई-वाहनधारकांना दिलासा; टॅक्स भरण्याच्या मेसेजेस तांत्रिक चूक असल्याचे स्पष्ट

ऑनलाइन डिलिव्हरीसुद्धा घटली

हॉटेलमध्येही खाद्यपदार्थ कमी असल्याने त्याचा विक्रीवरही परिणाम झाला असून, ऑनलाइन डिलिव्हरीही कमी प्रमाणात होत आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी व्यावसायिक गॅसच्या मासिक गरजेत 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अजून आवश्यक पुरवठा होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news