पुणे : कोंढव्यातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : कोंढव्यातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कोंढव्यातील लुल्लानगर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या सेक्स रॅकेटमधून ४ महिलांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये तीन थायलंडच्या तर एका भारतीय महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी लालरामन लाल्तफळा (वय २१, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. तर संदीप मोकाशी (रा. कोंढवा) आणि अमोल राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील लुल्लानगर परिसरात गुलमोहर अर्चिड बिल्डींगमध्ये लाना स्पर्श नावाचे स्पा सेंटर आहे. या ठिकाणी बेकायदेशीररित्या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अमंलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, प्रमोत मोहिते यांच्या पथकाने त्या ठिकाणी शनिवारी (दि.८) अचानक छापा टाकला.

यावेळी चार महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची बाब उघड झाली. यावेळी तीन थायलंड देशाच्या महिलांची तर एका भारतीय महिलेची सुटका करण्यात आली. या कारवाईत लाना स्पर्श स्पा सेंटरचा मालक आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news