

पुणे: पुण्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय वैभव जतन करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘हेरिटेज वॉक’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुन्हा एकदा सुरू होत आहे. काही महिन्यांपासून हा उपक्रम रखडला होता. मात्र, येत्या 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता हे रिटेज वॉक नव्या उत्साहात सुरू होणार आहे. या वॉकचे दर महापालिकेने जाहीर केले असून बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहेत. (Latest Pune News)
शहरात तब्बल 250 पेक्षा अधिक ऐतिहासिक वास्तू आहेत. शिवाजी पूल, घोरपडे घाट, शनिवारवाडा, कसबा गणपती मंदिर, लालमहाल, नानावाडा, भाऊ रंगारी निवासस्थान, तांबडी जोगेश्वरी मंदिर, दगडूशेठ गणपती, भिडे वाडा, नगर वाचन मंदिर, बेलबाग मंदिर, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग वाले राम मंदिर आणि विश्रामबाग वाडा या पुण्याच्या (पान 4 वर)
शुल्क आणि नोंदणी
या वॉकसाठी प्रौढांसाठी 300 रुपये, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये, माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये, तर परदेशी पर्यटकांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सविस्तर माहिती आणि बुकिंगसाठी नागरिकांना https://heritagewalk.pmc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.