Pune Rains: पुण्यातील 'या' भागांना मुसळधार पावसाने झोडपले, वाहतुकीचा खोळंबा

बाणेर परिसरात रस्त्यावर दीड फूट पाणी साठल्याने वाहतूक कोंडी
Pune Rains
पुण्यातील 'या' भागांना मुसळधार पावसाने झोडपले, वाहतुकीचा खोळंबा
Published on
Updated on

बाणेर : गुरुवारी दुपारपासून तीन ते चार तास परतीच्या जोरदार पावसामुळे बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावरील सुमारे एक ते दीड फूट पाणी साठल्याने वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती.

Pune Rains
Killari Cloudburst Rain : किल्लारी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

बाणेर मधील बाटा शोरूमजवळील मुख्य रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साठल्याने या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर सुस रोडवरील दत्त मंदिराजवळ राम नदीवरील पुलावर पाणी साठल्यामुळे एक बाजूचा रस्ता बंद करून वाहने सोडण्यात येत होती. बाणेर ज्युपिटर हॉस्पिटल समोरील रस्ता जवळपास दोन तास वाहतूक कोंडीत अडकला होता. बालेवाडी फाटा ते लक्ष्मी माता मित्र मंडळ पर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली पाहावयास मिळाली.

बाणेर परिसरातील मुख्य रस्त्यांवरील ताम्हाणे चौक, शिवनेरी पार्क परिसरात पावसाचे पाणी साठल्यामुळे वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत होते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे अनेक वाहने बंद पडत होती. पावसामुळे वाहतूक बाणेर परिसरातील मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

पावसाळी गटारांच्या स्वच्छता योग्य पद्धतीने न झाल्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी आपल्या समस्या औंध क्षेत्रीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवाव्यात, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Pune Rains
Ahilyanagar Rain Update: जिल्ह्यात आणखी तीन दिवस ‘यलो अलर्ट’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news