Pune Heavy Rain : शहरात धडकी भरवणारा पाऊस, गुरुवारी रात्रभर-शुक्रवारी दुपारपर्यंत कोसळला, शनिवारी घाटमाथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’

Heavy Rain
Heavy RainPudhari
Published on
Updated on

पुणे : शहरात गुरुवारी रात्रभर तर शुक्रवारी दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा पुणेकरांची दाणादाण उडाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने नदीपात्रात मोठा विसर्ग सोडावा लागला. दरम्यान, शनिवारीदेखील घाटमाथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आल्याने मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर रविवारी पाऊस उघडण्याची शक्यता आहे.

शहरात शुक्रवारी अक्षरशः धडकी भरवणारा पाऊस झाला. शहर आणि परिसरात कमी-अधिक वेगाने पाऊस झाला. त्यामुळे शिवाजीनगरात सुमारे २९.५ तर आंबेगाव ते खडकवासला भागात ४० ते ५५ मि.मी. पाऊस दुपारपर्यंत झाला. मात्र, धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली. खडकवासला धरणातून सुरुवातीला ४३ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने नदीपात्र फुगले अन् शहरात पूरस्थिती तयार झाली.

शुक्रवारी शहरात झालेला पाऊस (मि.मी.)

आंबेगाव, कात्रज ४७.६, खडकवासला ५६.६, वारजे ४२, डेक्कन ३८.२, शिवाजीनगर २९.८, पाषाण ३४, हडपसर २९.५, चिंचवड २८.५, कोरेगाव पार्क २३.

जुलै महिन्यात झालेला पाऊस (१ ते ३१ जुलै, मि.मी.)

  • शिवाजीनगर : ५८८

  • पाषाण : ६२६.५

  • लोहगाव : ७५९

  • आंबेगाव : ५००.४

  • खडकवासला : ५२६

  • वारजे : ४९०

  • डेक्कन परिसर : ४६०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news